Kapus pachvi Favarani : शेतकरी कट्टा या वेबसाईट वर आपले स्वागत.
निश्चितच या वर्षी तुमच्या कपाशीचे जास्तीत जास्त उत्पन्न वाढवायचा असेल तर, आपला हा लेख शेवटपर्यंत वाचा. आपले कापूस उत्पादक शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या पर्यंत आपले लेख जास्तीत जास्त शेअर करा.
kapus pachvi favarani वेळ
शेतकरी बंधूंनो एकंदरीत भरपूर सारे शेतकऱ्यांच्या सध्याच्या काळामध्ये कपाशी वरती चौथी फवारणी घेऊन झालेला आहे. आणि एकंदरीत शेतकऱ्यांचा सर्वात शेतकऱ्यांचा कापूस 100 ते 120 दिवसांचा आसपास गेलेला आहे. मित्रांनो या काळामध्ये या पिरेड मध्ये आपल्या कपाशी वरती पाचवी फवारणी करून घेणे गरजेचे आहे.
किडींसाठी
मित्रांनो आपल्या कपाशी वरती कोणत्या कोणत्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असतो?
त्याचा अगोदर विचार करूया तर ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा मावा, तुडतुडे, पांढरी माशी या मुख्य रस शोषण करणाऱ्या किडींचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो याच काळामध्ये आपल्याला बोंड आळी चा सुद्धा आपल्या कपाशी वरती प्रादुर्भाव झालेले पाहायला मिळतात.
या मुख्य आपल्या कपाशीला हानी पोहोचवणार्या किडींसाठी आपले चांगल्या उच्च दर्जाची फवारणी घेणे गरजेचे आहे.
पाते लागण्यासाठी
आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधूंनो 100% कपाशीला तिथे जास्तीत जास्त पाते धारणा झालेली असते त्याचे रूपांतर 100% बोंडामध्ये होण्यासाठी चांगल्या दर्जाचे विद्राव्य खत सुद्धा वापरणे गरजेचे आहे. हे कदाचित आपल्या कपाशी तिचा जास्तीत जास्त वाढ झालेली असेल तर, अशा टाईमला आपल्याला आपल्या कपाशीची वाढ थांबवणारे टॉनिकची त्याला आपण प्लांट ग्रोथ रेगुलेटर म्हणतो. तर त्याचे सुद्धा आपल्याला या टायमाला या फवारणी मध्ये वापर करणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो एकंदरीत मावा तुडतुडे पांढरी माशी याच्यावरती 100% रिझल्ट देणारे कोणते प्रॉडक्ट आहे ज्यात योग्य औषधाचा तुम्ही फवारणी मध्ये जर वापर केल्यास मावा तुडतुडे पांढरी माशी याच्यावरती 100% रिझल्ट आपल्याला मिळवून देता येईल.
फवारणी का करावी?
शेतकरी बंधूंनो तसं पाहिलं तर आपल्याला एक तर रस शोषण करणाऱ्या किडीसाठी फवारणी घेणे गरजेचे आहे.
किंवा शेतकरी बंधुनो तुमच्या कपाशी वरती कुठलाही प्रकारचा रस शोषण करणाऱ्या किडी नसेल तर?
तुम्हाला फक्त बोंड आळी साठी फवारणी घ्यायची असेल तर? त्याच्यासाठी औषध दोन प्रकारची फवारणी तुम्हाला पाचव्या वेळा फवारणी करताना तीच सांगणार आहे.
उपाय
शेतकरी बंधूंनो जर तुमच्या कपाशीवरती जास्तीत जास्त पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर?
आशा टायमाला आपल्याला एक चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरायचे आहे.
तर ते म्हणजे कंपनीचे slr525 हा घटक असलेल्या किंवा 525 याच्या मधलं घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचे कोणतेही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. मित्रांनो आपल्याला आणि त्याच्या सोबतच असे दोन प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. जे की पांढरी माशी वरती लाभकारक शंभर टक्के जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळून देतात. शेतकरी बंधूंनो जर तुम्ही slr525 वापरणार असाल तर प्रती पंधरा ते वीस लिटरचे पंपासाठी 30 ते 35 मिली आपल्याला याचं प्रमाण वापरून घेणे आहे.
त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कपाशीवर ती जास्तीत जास्त थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर? तुम्हाला इमिडाक्लोप्रिड 40 टक्के आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो 40% हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीत कोणते औषध फवारणी करताना वापरू शकता.
मित्रांनो आपल्याला बर्यापैकी पाहिले तर घरडा केमिकल कंपनी चा पोलीस या नावाने कीटकनाशक आहे.
किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे लेसेंटा या नावानेसुद्धा आपल्यालाही कीटकनाशक तिथे पहायला मिळते.
तर निश्चितच दोघांपैकी कोणतरी एक किटकनाशक वापरावे. याचे प्रमाण प्रति
पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला आठ ते दहा ग्रॅम जास्तीत जास्त दहा ग्रॅम पर्यंत तुम्ही फवारणी करताना वापरू शकता.
पाते धारणेसाठी
शेतकरी बंधूंनो जर तुमच्या कपाशीची वाढ जास्तीत जास्त झालेली असेल!
डोक्याच्या वरती तुमच्या कपाशीची उंची ती गेली असेल!
पाच साडेपाच फुटापर्यंत तुमच्या कपाशीची वाढ झालेली असेल!
तर आपल्याला चमत्कार किंवा ताबोली किंवा शेतकरी मित्रांनो लियोसीन यासारख्या फवारणी मधून वापर करणे गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो सदर सांगितलेल्या कीटकनाशकं मध्ये तुम्ही सदर सांगितलं कोणताही मिक्स करून तिथे फवारणी करू शकता. त्याच्या पाठी मागचे कारण म्हणजे तुमच्या कपाशी पाते गळ होत असेल तर, ती थांबेल कारण अनावश्यक कपाशीची वाढ थांबते आणि एकंदरीत अन्नद्रव्य खर्च करायचा तर तर ते योग्य दिशेला आपला कापूस पीक करत राहतो.
शेतकरी शोषण करणाऱ्या किडीसाठी फवारणी कपाशी पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी नसेल. कारण आपण चौथी फवारणी अतिशय जबरदस्त सांगितली ती चौथी फवारणी जर तुम्ही आपला लेख पाहून घेतली असेल तर,
तुमच्या आता सध्याच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव नसेल.
आतापर्यंत एकंदरीत विचार केला, बोंड अळीचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी काय करावे?
किंवा बोंड आळी साठी कोणती फवारणी घेणे गरजेचे आहे?
बोंड आळीसाठी उपाय
शेतकरी मित्रांनो बोंड आळी साठी चार ते पाच प्रकारचे कीटकनाशक सांगतो कोणत्याही कीटकनाशक तुम्ही बोंड आळी साठी फवारणी करत असाल तर तिथे वापरू शकता.
त्याच्यामध्ये लेबल क्लेम असलेलं आपलं महाराष्ट्र सरकार चे प्रॉडक्ट करतात तर ते म्हणजे आपल्या कंपनीचं डेनिटोल.
शेतकरी मित्रांनो तुम्ही चार पैकी कोणतेही एक कीटकनाशक आपल्या बोंड आळीचे फवारणीसाठी वापरू शकता. वापरणार असाल तर त्याचे प्रमाण 15 ते 20 लिटर साठी 35 ते 40 ,मिली आसपास वापरू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो वापरण्यात सिजेंटा कंपनीचे अंपलिगो या नावाचा कीटकनाशक तर तुम्हाला जर वापरायचा असेल तर हे प्रमाण प्रति १५ ते २० लिटरच्या पंप साठी आपल्याला आत्मिक वापरणं गरजेचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो वापरणार तर तुम्ही आपलं जे धानुका कंपनीचे या नावाने कीटकनाशके शेतकरी बंधूंनो वापरलं तर तुमच्या कपाशीवरील थ्रिप्स आहे तर त्यातसुद्धा शंभर टक्के नियंत्रण होते.
त्याच्या सोबत शेतकरी मित्रांनो अळी व थ्रिप्ससुद्धा आपल्याला या कीटकनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो.तर तुम्ही सुद्धा या फवारणी मध्ये आळी नियंत्रण त्यासोबतच थ्रिप्स नियंत्रण साठी वापरू शकता.
त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची कीटकनाशक आहे तर ते म्हणजे आपलं एफ एम सी कंपनी कोरेजन.
मित्रांनो तुम्ही बोंड आळी नियंत्रण करण्यासाठी फवारणी मधून वापर करू शकता. याचा प्रमाण आपल्याला प्रत्येक वीस लिटरच्या पंप साठी किंवा पंधरा लिटरच्या पंप साठी ५ ते ६ मिली कोरेजन चे प्रमाण वापरू शकता.
शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचे टाकूनमी या नावाने कीटकनाशक येतं तर टाकूनमी सुद्धा तुम्ही फवारणी मधून बोंड आळी नियंत्रणासाठी वापर करू शकता.
किंवा बायर कंपनीचे फेम या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही बोंड आळी नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकता.
मित्रांनो लेख कसा वाटला? आवडला असला तर खाली कमेंट करुन सांगा.
कुठलाही पाचव्या फवारणी बद्दल तुम्हाला प्रश्न पडला असला तरी कॉमेंट करा. हा लेख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद ..
kapus bond ali niyantran ? / कापूस बोंड अळी १००% नियंत्रण कसे करावे ?