Pategal Thambavnysathi Upay? / पातेगळ थांबवण्यासाठी १०० % खात्रीशीर उपाय?

Pategal Thambavnysathi Upay : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी कट्टा या वेबसाईट वर . शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात सर्व शेतकऱ्यांची कापूस एकंदरीत 100 ते 120 दिवसाच्या आसपास झालेला आहे. आणि भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कपाशीला जास्तीत जास्त पातेधारणा झालेली आहे. परंतु भरपूर सारे शेतकऱ्यांच्या पातेगळ आपल्याला पहायला मिळत आहेत.

मला भरपूर सारे शेतकरी जवळपास 80 ते 90 टक्के शेतकरी कपाशी पातेगळ/Pategal होत आहे. काय करणे गरजेचे आहे? याच्या संदर्भात कमेंटमध्ये प्रश्न विचारत असतात. शेतकरी मित्रांनी हा लेख शेवटपर्यंत पहा. लेखामध्ये आपण एक अंदाजे शंभर टक्के पात्यांचे रूपांतर बोंडात होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? त्याच्या सोबत शेतकरी मित्रांनो आपल्या बोन्डाची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? याच्या संदर्भात अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांना लेख आवडला तर इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा.

Pategal / पातेगळ होण्याची कारणे?

मित्रांनो आपल्या कपाशी पाते गळ होणे याच्या पाठी मागचे दोन तीन प्रकारची कारण आहे.

त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सारखे ढगाळ वातावरण राहणे किंवा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त पाऊस चार-पाच दिवस सारखा पाऊस जरी पडला तरी आपल्या कपाशीची पातेगळ/Pategal होते.

किंवा जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या कपाशीची पातेगळ होते. आणि त्याचे बोंडात रूपांतर होत नाही.

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील आपल्या कपाशीची पातेगळ होते.

किंवा शेतकरी मित्रांनो नायट्रोजन युक्त खतांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे देखील आपल्या कपाशी पातेगळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी करायचं काय आहे?

पातेगळ उपाय?

शेतकरी मित्रांनो आपल्याला जर एक चार ते पाच टक्के पात्यांचे रुपांतर बोन्डात व्हायला सुरुवात झालेली असेल तर, अशा टाईमला आपले फवारणी घेणे गरजेचे आहे.

फवारणी मध्ये मित्रांनो आपल्याला ००:५२:३४ या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे.

त्याच्या सोबत शेतकरी मित्रांनो आपल्या झाडांची वाढ थांबवणार या प्लांट ग्रोथ रेगुलटर चा वापर करायचा आहे.

शेतकरी मित्रांनो चमत्कार किंवा टाबोली यांसारख्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर चा आपल्याला फवारणी मधून वापर करायचा आहे.

शेतकरी बंधूंनो या फवारणी मध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस आणि वाढ थांबवणे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाचं बुरशीनाशकाचा देखील आपल्याला या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे.

ज्या बुरशीनाशकाचा तुम्हाला चांगला रिझल्ट वाटतो तर त्या बुरशीनाशक फवारणी मध्ये वापरा.

प्रमाण

आता झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचे प्रमाण आपल्या पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी 80 ते 100 ग्रॅम घ्यायचे आहे.

आणि तुम्ही कोणत्याही लियोसीन घेणार असेल तर चार ते पाच मीली वापरा. चमत्कार वापरणार असाल तर वीस ते पंचवीस मिली वापरा. किंवा शेतकरी मित्रांनो टाबोलि वापरणार असाल तर, चार ते पाच मिलि आपल्याला वापरणे गरजेचे आहे.

मित्रांनो इतर कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका.

लेख आवडला तरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तर शेअर करा.

धन्यवाद.

Tata Bahaar Tonic mahiti? / टाटा बहार बद्दल संपूर्ण माहिती.

See All Posts

Leave a Comment