herbicide : तणनाशक वापरल्यानंतर झाड का वाळते – पहा संपूर्ण माहिती

तणनाशक, tannashak,

तणनाशक वापरल्यानंतर झाड का वाळते?

herbicide : ग्लायफोसेट तणावर फवारल्यानंतर प्रामुख्याने त्याचे पानातून शोषण होते. त्यातही पूर्ण वाढ झालेल्या पानातून जास्त शोषण होते.

तेथून पानात तयार झालेली अन्नद्रव्य इतरत्र पसरण्याच्या प्रक्रियेतून सर्व वनस्पतीत तणनाशक पसरते.

ते मूळ आणि त्यातही कंद असल्यास त्यात जास्त प्रमाणात साठवले जाते.

दमट हवा व सामान्य तापमानात यांचे शोषण जास्त चांगल्या प्रकारे होते. मुळे, खोड, पाने, या क्रमाने वनस्पतीची वाढ खुंटते आणि ती वाळते.

Yojna : गाय/म्हैस गोठा 100% अनुदान : येथे पहा

ग्लायफोसेट शोषणानंतर त्याचे अमिनो मिथाईल फॉस्फोनिक आम्ल या स्वरूपात वनस्पतीमध्ये भिनते.

संशोधन असे सांगते, की पीक उत्पादनात (फळे अगर धान्ये, कडधान्ये) वनस्पतीचा इतर भागांच्या तुलनेत याचे अंश अत्यल्प राहतात.

या आम्लाचे पुढे विघटन होऊन कर्ब वायू अधिक पाणी या स्वरूपात त्याचे अंश संपून जातात.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

ग्लायफोसेटचे विघटन होऊन कर्बवायू आणि पाणी होते. ही क्रिया प्रामुख्याने सूक्ष्मजीवांकडून पार पाडली जाते.

जमिनीचा सामू, आर्द्रता, तापमान, विघटन होऊ शकणारे पदार्थ आणि सूक्ष्मजीवांच्या अन्नाच्या उपलब्धतेचा ग्लायफोसेटच्या विघटनावर परिणाम होतो.

या ठिकाणी विघटन होऊ शकणारे पदार्थ याचा अर्थ कुजलेले खत नव्हे. कुजणारा पदार्थ असा आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

ज्या जमिनीत रसायनांचे स्थिरीकरण व विजातीय विद्युत भारामुळे चिकटून राहण्याचे प्रमाण जास्त असते तेथे विघटनाचा वेग कमी राहतो.

कमी सामू व सेंद्रिय कर्ब भरपूर असणाऱ्या जमिनीत वरील कारणाने विघटनाचा वेग कमी राहतो. जमिनीत असणाऱ्या सोडिअम व कॅल्शिअमचाही विघटनावर परिणाम होतो.


Yojna : गाय/म्हैस गोठा 100% अनुदान : येथे पहा