कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय ! झटपट कांदा मोठा होणार

कांदा फुगवण्यासाठी उपाय,kanda fugavnyasathi upay, कांदा फुगवण्यासाठी खत, कांदा फुवण्यासाठी औषद,


नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर.

कांदा फुगवणीसाठी योग्य काळ


शेतकरी मित्रांनो एकंदरीत कांदा 60-65 दिवसानंतर फुगायला (कांद्याची size वाढायला ) सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते.

तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा कांदा 60 दिवस होऊन गेलेले असतात तरी देखील फुगत नाही.

मी तुम्हाला कांद्याची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी नेमकं तुम्ही तुमच्या कांदे पिकावर ते कोणत्या उपाययोजना करू शकतात यासंदर्भात अतिशय थोडक्यात परंतु चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतोय.

तुम्ही जर आपल्या स्मार्ट शेतकरी वेबसाईट नवीन आला असाल तर आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा व हि माहिती इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका.


कांदा फुगवण न होण्याची मुख्य कारणे

शेतकरी मित्रांनो आपण जे काही खत वगैरे टाकतो तर ते कधी कधी आपल्या कांदे पिकाला तिथे लागू होत नाही त्याच्यामुळे कांद्याची तिथे म्हणाव तशी साईज होत नाही.

तुम्ही चुकीचे खत कांदा फुगवणीच्या वेळेवर तिथं टाकलेले पाहायला मिळतात.

चुकीचे खत म्हणजे कोणती शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा 60 दिवसाच्या आसपास जातो तर अशा वेळेला भरपूर सारे शेतकरी 24:24:00 किंवा डी.ए.पी वैगेरे ज्याच्यामध्ये पोटॅश ची मात्रा झिरो टक्के असते.

पोटॅश हे अन्नद्रव्य असे असते की आपला कांदा फुगवण्यासाठी मदत करत असते.


कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे

कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे/कांदा फुगवण्यासाठी औषध/कांदा फुगवण्यासाठी कोणते खत वापरावे खाली दिलेले आहे


कांदा फुगवण्यासाठी उपाय

तर मित्रांनो कांदा फुगवण्यासाठी आपण पोटॅश युक्त खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

10:26:26 किंवा महाधन चे 8:21:21 आहे, किंवा 12:32:16 किंवा 14:35:14 यांसारखी जी खाते आहेत तर ती 40 ते 50 दिवसाच्या आसपास आपल्याला जास्तीत जास्त कांदा पिकावरती वापर करणे गरजेचे आहे.


कांदा पिकासाठी 00:52:34 खताचे फायदे

जर तुमच्या पिकाचा ४० ते ५० दिवसांचा काळ निघून गेला असेल तर तुम्ही काय दुसऱ्या उपाययोजना करू शकता ?

शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा कांदा ६० ते ७० दिवसाच्या आसपास असतो तर अशा वेळेस तुम्ही 00:52:34 या विद्राव्य खताची फवारणी करू शकता.

मित्रांनो 00:52:34 हे विद्राव्य खत तुम्ही फवारणी मध्ये वापरू शकता, प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम

किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाठ पाण्यातून जर सोडू शकत असाल तर तुम्ही प्रत्येकासाठी 5 किलो 00:52:34 या विद्राव्य खत तुम्ही पाठ पाण्यातून सोडू शकता.

मित्रांनो ह्या विद्राव्य खतांमध्ये 34 टक्के पोटॅशची मात्रा आहे, ज्यामुळे आपल्या कांद्याला झटपट विद्राव्य खत असल्यामुळे लवकरात लवकर लागू झालेले आपल्याला पाहायला मिळते.


कांदा पिकासाठी 00:00:50 खताचे फायदे

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा कांदा ८०-९० दिवसाच्या आसपास जातो तर अशा वेळेस आपल्याला 00:00:50 या विद्राव्य खताची फवारणी किंवा ड्रीप द्वारे सोडणे गरजेचे आहे.

00:00:50 चे प्रमाण तुम्ही 100 ग्रॅम एका पंपासाठी फवारणीसाठी वापरा आणि जर ड्रीप ने सोडणार असाल तर आपल्याला ४ ते ५ किलो प्रति एकरासाठी तिथे सोडणे गरजेचे आहे.


कांदा पिकासाठी पोटॅशिअम सोनाईट चे फायदे

त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून एक पर्याय तुम्ही करू शकता जे की पोटॅशियम सोनाईट येतं पूर्णपणे पाण्यात विरघळणारा खत आहे.

तर ते खत तुम्ही पाठ पाण्यातून सोडू शकता प्रति एकरासाठी ८ ते १० किलो किंवा तुम्ही पोटॅशियम सोनाईट सुद्धा 90 दिवसाच्या आसपास फवारणी करू शकतात, ज्याचं प्रमाण तुम्ही 100 ग्रॅम प्रति पंपासाठी घेऊ शकता.

शेतकरी मित्रांनो कांदा फुगवण्यासाठी ३ उपाययोजना मी तुम्हाला सांगितल्या आहेत.


कांदा पिकासाठी खताचा दुसरा ढोस

सगळ्यात महत्त्वाचा असतो तर ते म्हणजे खत व्यवस्थापन बऱ्यापैकी तुम्हाला दुसरा खताचा ढोस 10:26:26 किंवा 14:35:14 यांसारख्या खताचा द्यायचा आहे.


या कारणामुळे कांदा पिकाला खते लागू होत नाही

10:26:26 किंवा 14:35:14 जास्तीत जास्त तुम्ही 55 ते 60 दिवसाच्या आत मध्येच देऊन घेणे गरजेचे आहेत त्याच्यापेक्षा जर उशीर झाला, तर टाकलेली खाते लवकरात लवकर लागू होत नाही.

जो कांदा फुगवण्यासाठी जो काळ असतो तो निघून गेल्यावर तिथे आपल्याला पाहायला मिळतो.


जर तो काळ निघून गेल्यानंतर तुम्ही पोटॅशियम सोनाईट किंवा विद्राव्य खतांचा वापर तिथे अवश्य करू शकता जेणेकरून तुमचा कांदा फुगवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल.

अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा भरपूर सारे कांदा व इतर पिकासंदर्भात नवनवीन माहिती तिथे मिळेल.

धन्यवाद


आजचा हवामान अंदाज – येथे पहा

महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा