पंजाब डख हवामान अंदाज आजचा । Panjabrao dakh weather today 2024

पंजाब डख हवामान अंदाज आजचा,panjabrao dakh hawaman andaj, पंजाब डख, पंजाबराव डख,panjab dakh, Panjabrao dakh,


पंजाब डख हवामान अंदाज आजचा video

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील विडिओ पहा


पंजाब डख हवामान अंदाज

नमस्कार मी पंजाब डंख हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी .आज आहे 15 फेब्रुवारी 2024 आजपासून परत एकदा अंदाज देत आहे.

कारण की विदर्भातील खूप शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. आमचे हरभरा काढणी चालू आहे

पावसाची शक्यता (Panjabrao dakh weather today)

तर विदर्भातही शेतकर्यांनी एक लक्षात घ्या पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भामध्ये तुम्हाला एक सांगतो फक्त म्हणजे आज 15 आणि उद्या 16 दोन दिवस तुमच्याकडेमध्ये थोडा पावसाचं वातावरण आहे.

संपूर्ण विदर्भात पडणार नाही फक्त तुम्हाला एक सांगतो. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो.

चांदूरबाजार तालुक्यामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी पडेल. त्यानंतर आकोट भागाकडे आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा थोडाफार पाऊस येण्याची शक्यता आहे आणि वाशीमच्या कारंजा लाड या भागात पाऊस येण्याची शक्यता आहे.

खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही.

पण हे फक्त पूर्व विदर्भ व विदर्भातील शेतकर्यांसाठी फक्त म्हणजे अमरावती जिल्हा,अकोला जिल्हा या भागांमध्येचा पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या


ढगाळ वातावरण

त्यानंतर राज्यातील इतर परिस्थिती बघितली तर राज्यांमध्ये आता जवळपास म्हणजे आता 15,16,17, हे 3 दिवस आणखी दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यावा.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही आता उद्यापासून म्हणजेच 16 पासून उर्वरीत राज्याच्या भागात हवामान कोरडे होणार आहे. पाऊस काही येणार नाही. त्यामुळे एवढी चिंता काही करायची गरज नाही.

या तारखेपर्यंत मोठा पाऊस येणार नाही ?

जवळ जवळ सांगायचं झालं तर 29 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 29 फेब्रुवारी शेवटच्या दिवशीपर्यंत राज्यात काही मोठा पाऊस येणार नाही. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही.

पण ज्यांचे गहू,हरभरा,तूर काढणीस आलेली असेल त्यांनी काय करायचं ? 29 फेब्रुवारी पर्यंत मात्र तुम्ही तुमचा पीक काढून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा.


वातावरण खराब होणार ?

कारण की 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे.हे पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे.

त्यानंतर 29 ते 4 मार्च दरम्यान नेमका कुठे पाऊस पडणार? हे आठ दिवसांनी डिटेल माहिती देईल.

शेतकऱ्यांसाठी आणखी 15 दिवस आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.


उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज

उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता म्हणजे आज 15 फेब्रुवारी 2024 आहे तर काही चिंता करू नका. तुमच्याकडे पाऊस काही येणार नाही. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही.

फक्त 21 आणि 22 तारखेला थोडे आभाळ येईल. तुम्हाला वाटेल पाऊस येईल का? काही चिंता करू नका, पाऊस येणार नाही. फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. 21 आणि 22 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये हा अंदाज लक्षात घ्यावा.

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा हवामान अंदाज

त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. तुमचे हरभरा,तूर,गहू 29 तारखेपर्यंत काढून घ्या. कारण कि 29 तारखेनंतर एकदा वातावरणात बदल होणार आहे.म्हणून हा देखील अंदाज व्यक्त करत आहे.


अचानक वातावरणात जर बदल झाला तर नवीन अंदाज दिला जाईल धन्यवाद.


पंजाब डख हवामान अंदाज नवीन : येथे पहा

महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा


पंजाब डख हवामान अंदाज today

Panjabrao dakh weather today

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

panjabrao dakh weather today live