पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

पंजाब डख, पंजाब डख हवामान अंदाज,panjabrao dakh, panjabrao dakh today,panjabrao dakh weather today,

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे 17 मार्च 2024.



आपण मागच्या अंदाजात सांगितले होते की पूर्व विदर्भात पाऊस पडणार तर कालच 16 मार्चला नांदेड,नायगाव,देबलु,चंद्रपूर,अमरावती अशा बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली.

हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच पडणार आहे.

म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.

हवामान अंदाज व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा

पूर्व विदर्भामध्ये हळद,कांदा,गहू,हरभरा काढणी चालू आहे.

म्हणून फक्त पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात ठेवा.


या तारखेला अवकाळी संकट

18 मार्च,19 मार्च ,20 मार्च ,21 मार्च पर्यंत पूर्व विदर्भात अवकाळीच संकट आहे.

पूर्व विदर्भामध्ये वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ,गडचिरोली या भागात पाऊस पडणार आहे


या भागाला फटका बसणार

त्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे छत्तीसगड कडे पडणार आहे.

तेलंगणा,छत्तीसगड मध्ये पाऊस पडल्यामुळे त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातील लगतच्या तालुक्याला,जिल्ह्याला पडणार आहे.

म्हणून अहमदपूर,उदगीर,नांदेड,हिंगोली,यवतमाळ,अकोला आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल.

पश्चिम विदर्भाकडे जास्त पडणार नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

महाराष्ट्रातील नवीन योजना – येथे पहा


या जिल्ह्यात जास्त पाऊस – पंजाब डख

फक्त जास्त पाऊस पूर्व विदर्भात 6,7 जिल्ह्यात पडणार आहे, ज्यात वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली,यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा हवामान अंदाज

उत्तर महाराष्ट्राकडे 20 दिवस येणार नाही.

पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही, काही चिंता करायची गरज नाही.

मराठवाड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे.


या तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढणार ?

22 तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. राज्यात काही काही भागातला पारा 43,44 अंशापर्यंत जाणार आहे.