Boron 20% che fayde? बोरॉन २०% पिकामध्ये फायदे?

Boron 20% che fayde : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी कट्टा वेबसाईट वर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो.

परिचय

तर शेतकरी मित्रांनो आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्य असतं तर याचे आपल्या पिकांमध्ये कशा प्रकारे आपल्याला फायदे होतात? आणि आपण त्याचा वापर कशा प्रकारे आपल्या कोणतीही पिकांमध्ये ते करू शकतो? तर या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की,

हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्हाला एक सविस्तर अंदाज येईल की नेमका पिकांमध्ये आपल्या बोरॉन चे काय कार्य असतात? आणि त्याचे आपल्याला कशा प्रकारे ते फायदे होऊ शकतात?

बोरॉन म्हणजे काय?

शेतकरी मित्रांनो आपण जर अन्नद्रव्यांचे प्रकारांमध्ये सर्वप्रथम जर विचार केला तर प्राथमिक अन्नद्रव्य असते.

त्याच्या सोबतच आपल्याला द्वितीय अन्नद्रव्य आणि त्याच्या सोबतच आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य असतात. आपले अन्नद्रव्याचा वेगळेपण करून दिलेला क्रम आपल्याला पाहायला मिळतो.

आपण जर प्राथमिक अन्नद्रव्य व जर विचार केला तर

त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या अन्नद्रव्यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

आणि शेतकरी मित्रांनो आपण जर सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर विचार केला तर

सूक्ष्म अन्नद्रव्य मध्ये आपल्याला झिंक,मॅग्नेशिअम,बोरॉन,फेरस,आयर्न असे वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नद्रव्य आहे. तर त्याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

सूक्ष्म अन्नद्रव्य मध्ये आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य जे बोरॉन एक प्रमुख अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

Boron / बोरॉन चे फायदे

शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्या पिकाची शारीरिक आणि बौद्धिक विकास पूर्णपणे होण्यासाठी बोरॉन येथे मदत करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे कि आपल्या पिकांमधील हमोंस इंबॅलन्स झालेले असतात. तर त्यांना बॅलन्स करण्यासाठी केलेले कार्य करताना आपल्याला पहायला भेटतात. ते पूर्णपणे आपल्या झाडाची नैसर्गिक वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

आणि तसेच फुलगळ वगैरे होत असतील तर ते पूर्णपणे थांबते. आणि जास्तीत जास्त फुले येथे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो कधी कधी काय होतं आपलं फळ वगैरे लागेल जरा जर आपल्या पिकाला आणि त्याच्यामध्ये असे क्रॅकिंग होण्यास सुरुवात होत असते. तर ही एक बोरॉन/Boron 20% ची कमतरता आपण तेथे समजू शकतोय. आणि जर आपण अशा वेळेला जर बोरॉन चा जर वापर केला तर, शंभर टक्के जी फुलांची फळांची क्रॅकिंग वगैरे जर असते तर ती पूर्णपणे थांबलेली आपल्याला पाहायला मिळू शकते.

शेतकरी मित्रांनो बोरॉन चे आजून एक कार्य आहे की आपल्या फळांमधील बियांचा जास्तीत जास्त याचं प्रमाण वाढवायचं बोरॉन तिथे कार्य करते. आणि तसेच तुमची आपल्या पिकांमध्ये जी प्रकाश मधील संश्‍लेषणाची क्रिया असते जेणेकरून आपल्या आपल्या पिकांमधील ते अन्नद्रव्य तयार होत असतं, तर ते अन्नद्रव्य जास्तीत जास्त तयार होण्याचे काम करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याची आपल्या झाडाच्या पाण्यामधील जी शुगर मोमेन्ट असतील तर त्याच्यामध्ये तीव्रता जेणेकरून आपल्या पिकांमधील जे अन्नद्रव्य तयार होण्याची प्रक्रिया आहे तर तिला वेग येतो.

मित्रांनो आणि एकंदरीत आपल्या पूर्णपणे झाडाच्या फळाची चांगल्या प्रकारे विकास झालेला पाहायला मिळतो. आणि त्याच्या सोबतच मुळांचा पण येथे चांगल्या प्रकारे ते विकास झालेला पाहायला मिळू शकते.

बोरॉन च्या कमतरतेची लक्षणे

शेतकरी मित्रांनो आपण जर बोरॉनच्या कमतरतेचे जर लक्षणांचा जर विचार केला तर

झाडाच्या जुन्या पानांमध्ये असे पिवळ्या कलरची चट्टे पडलेल्या आपल्याला पहायला मिळू शकते. आणि नवीन पानावर देखील याचे पूर्णपणे पॅचेस पडलेले आपल्याला पाहायला मिळू शकते.

Boron 20%/बोरॉन वापरण्याची पद्धत

शेतकरी मित्रांनो आपण बोरॉन चा वापर कशा पद्धतीने आपल्या पिकांमध्ये करू शकतो?

तो तर आपण तीन पद्धती मध्ये आपल्या पिकाला बोरॉन चा वापर येथे करू शकते त्याच्यासोबत मध्ये

आपण मुख्य काम म्हणजे खतासोबत दोन ते तीन किलो बोरॉन/Boron 20% चे प्रमाण वापरू शकतो. हे मिक्स करून माती मध्ये टाकू शकते.

दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फवारणीद्वारे वापर करू शकतो.

आपण बोरॉन 20 टक्के असलेले कोणतेही विद्राव्य खते देऊ शकत आहे. आणि इतर कोणतेही कीटकनाशक सोबत 25 ते 30 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण ते विद्राव्य खतांचा वापर करू शकता.

Boron / बोरॉन चे प्रमाण

तर शेतकरी मित्रांनो आपण ड्रीप द्वारे देखील यांचा वापर करू शकता. ड्रीप द्वारे आपल्याला प्रति एकरसाठी अडीचशे ते 400 ग्रॅम आपण बोरॉन/Boron 20% चे प्रमाण सोडू शकतो.

शेतकरी मित्रांनो आपण एकंदरीत जी बोरॉनचे/Boron 20% कार्य काय आहे? आणि बोरॉन चा वापर आपण कशाप्रकारे आपल्या कोणतेही पिकामध्ये करू शकतो? तर या संदर्भात एक सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत करा.

धन्यवाद..

Pategal Thambavnysathi Upay? / पातेगळ थांबवण्यासाठी १०० % खात्रीशीर उपाय?

See All Posts.

Leave a Comment