how to make jivamrut easy step : जीवामृत कसे बनवावे? / जीवामृताचे फायदे / प्रमाण

जीवामृत, jivamrut,

Jivamrut/जीवामृत बनवण्यासाठी आवश्यक वस्तू


Jivamrut/जीवामृत तयार करण्यासाठी दहा लिटर गोमूत्र किंवा पाच ते सात लिटर देशी गाईचे गोमुत्र घेतले तरी चालते.

  • तीन किलो ग्रॅम गूळ
  • गाईचे पाच किलो ग्रॅम शेन
  • दोन किलो बेसन पीठ
  • दोनशे लिटर पाण्याची टाकी
  • एवढे साहित्य जीवामृत बनवण्यासाठी आवश्यक असतं.

जीवामृत वापरण्याचे फायदे : येथे पहा.


जीवामृत कसे बनवावे?

🔴 सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये पाच किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे. ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही.

🔴 दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा.

🔴 या मिश्रणामध्ये गुळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते पटकन ऍक्टिव्ह होतात.

एका एकर साठी किती जीवामृत सोडावे : येथे पहा.

🔴 गूळ मिसळताना त्याचे खडे राहणार नाहीत तसेच ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावे.

🔴 नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्र युक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.

जीवामृत वापरायचे फायदे : येथे पहा.

🔴 या मिश्रणामध्ये दोन किलो ग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे. थोड्या वेळा पर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे.

🔴 नंतर सगळे मिश्रण 200 लिटर च्या बॅरल मध्ये टाकून त्या बॅरल मध्ये पूर्ण पाणी भरावे.

🔴 नंतर शेतातील बांधावरची मूठभर माती बॅरल मध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे.

🔴 हे तयार केलेले द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे.

🔴 सात दिवसात जीवामृत वापरले तरी चालते.

एका एकर साठी किती जीवामृत सोडावे : येथे पहा.


जीवामृत तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.

त्याचा जास्तीत जास्त वापर करणे फायद्याचे ठरेल.


Topics Covered in Article:

  • How to Make Jivamrut
  • जीवामृत Marathi pdf
  • What are the benefits of Jeevamrut?
  • What are the ingredients of Jeevamrut?

Join Whatsapp Group : Click Here