Kapus Kokda Niyantran? / कपाशीवरील कोकडा 100% नियंत्रण कसा करावा?

Kapus Kokda Niyantran – तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या शेतकरी कट्टा या वेबसाईट वरती.

आज या पोस्ट मध्ये कपाशीवरील कोकड्याचे १००% नियंत्रण ? तर हा लेख शेवटपर्यंत वाचा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेयर करण्याचा नक्की प्रयत्न करा.

मित्रांनो या वर्षीचा पाऊस पिकासंदर्भात जर तुम्हाला आपले लेख पाहून थोडा फार का होईना फायदा झाला असेल तर,

आपल्या पोस्ट च्या खाली कमेंट करून सांगा .आणि आपल्या इतर कापूस उत्पादक शेतकरी पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

कोकडा रोग म्हणजे काय?

मित्रांनो सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांचा कापूस लागवड करून शंभर दिवस होऊन गेले आहेत.

आणि आशा टायमाला आपल्या कपाशीवरील वेगवेगळ्या प्रकारच्या मुख्य रस शोषण करणाऱ्या किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो.

आणि जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या कपाशीची पाने वाकडेतिकडे होतात आणि आपल्याला आपल्या कपाशी वरती कोणता रोग आला आहे? किंवा काय फवारणी करावी? ते देखील समजत नाही. शेतकरी मित्रांनो वाकडेतिकडे पाने म्हणजेच शेतकरी आपल्या कपाशीवर सर्वसाधारण कोकडा रोग आला आहे. असे म्हणतात.

Kapus Kokda / कोकडा रोगाचे प्रकार?

मित्रांनो निश्चितच दोन प्रकारची कोकडा रोग किंवा दोन प्रकारच्या वाकडेतिकडे पाने आपण आपल्या कपाशीमध्ये जर बारीक निरीक्षण केलं तर पाहायला मिळू शकतात. शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगतो तर ते म्हणजे जर आपल्या कपाशीची पाने जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतील खालच्या दिशेने झुकलेले असतील. आणि त्या पानाच्या कडांना किंवा त्या पानाच्या काठावर असतात. तर त्या काठाला पिवळसर लालसर रंगाची एक लाईन असेल. तर अशा वेगळ्या करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असतो.

किंवा शेतकरी मित्रांनो जर आपल्या कपाशीची पाने पूर्णपणे वाटी सारखे झाले असेल. आभाळाच्या दिशेने चुकले असतील किंवा आभाळाच्या दिशेने सारखे झालेले असेल तर, अशा टाईमला आपल्या कपाशी वरती वेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडी तर आपल्याला पाहायला मिळतो.

Kapus Kokda / कोकडा रोग १ – उपाय

शेतकरी मित्रांनो आता पहिली समस्या म्हणजे जमिनीच्या दिशेने झुकलेले पाने व ज्या कडा आहेत तर त्या लालसर पिवळसर रंगाचे झालेले आहेत. तर अशा टाईमला आपल्या कपाशी वरती जास्तीत जास्त तुडतुडा या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. आता तुडतुड्यांवर ती शंभर टक्के नियंत्रण मिळवून देणाऱ्या कोणते कीटक नाशक उपलब्ध आहे तर ते म्हणजे

शेतकरी मित्रांनो एक तर आपण जे इंडोफील कंपनीचा टोकन या नावाचं कीटकनाशक १५ ते २० लिटर च्या प्रति पंपसाठी ८ ते १० ग्रॅम फवारणी मधून वापरू शकता.

किंवा शेतकरी मित्रांनो जे यूपीएल कंपनी चे उलाला या नावाचे कीटकनाशक देखील आपण वापरू शकता. याचे प्रमाण आपल्याला 15 ते 20 लिटर पंपासाठी ८ ग्राम वापरायचे आहे.

शेतकरी मित्रांनो आपल्याला दोघापैकी कोणतेहि एक किटकनाशक वापरावे शंभर टक्के तुडतुड्यावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळणार आहे.

कोकडा रोग २ – उपाय

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जी दुसरी समस्या आहे तर,

ते म्हणजे पाणी आभाळाच्या दिशेने होणे किंवा वाटी सारखे पानेंपूर्णपणे आपल्या कपाशीचे पाहायला मिळत असेल तर,

आशा टायमाला आपल्या कापूस पिकावर ती मुख्यता थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो.

याच्यासाठी शेतकरी मित्रांनो एक तर आपल्याला गार्डा केमिकल कंपनी चा पोलीस याच प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटर सर्वांसाठी ८ते १०ग्रॅम वापरायचा आहे.

किंवा शेतकरी मित्रांनो जे बायर कंपनीचे जम्प आहे. तर याच प्रमाणे आपल्याला 15 ते 20 साठी ३ ते ४ ग्रॅम वापर करणे गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो दोन प्रकारची कोकडं रोग असतात दोघांपैकी नेमका आपल्या कपाशी वरती कोणता रोग आलाय? आणि त्याच्या वरती हेच कीटकनाशक अवश्य वापरा 100% तुमचा कापूस पिकावरील रोग नियंत्रण झाल्याशिवाय राहणार नाही.

लेख आवडला असेल तर इतर शेतकरीमित्रांपर्यंत नक्की शेयर करा. व कोणतेही प्रश्न असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद..

COTTON BG4 / नवीन कापूस बियाणे / संपूर्ण माहिती?

See All Posts.

Leave a Comment