UPL Ulala Sampurn Mahiti : नमस्कार शेतकरी मित्रांनोशेतकरी कट्टा या वेबसाईट वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी बंधूंनो एकंदरीत सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची लागवड होऊन 50 60 70 दिवस झाले आहे.
आणि आशा टायमाला भरपूर सारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या आपल्या कापूस पिकावरती करत असतात.
आणि त्यात सर्वात जास्त एक कीटक नाशक कापूस पिकावर फवारणी मध्ये वापरले जातात.
तर ते म्हणजे यू पी एल कंपनीचे ऊलाला/UPL Ulala किटकनाशक यासंदर्भात सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय.
मित्रांनो लेख आवडला तर व माहिती चांगली माहिती वाटली तरच, इतर कापूस उत्पादक शेतकरी पर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
तर शेतकरी मित्रांनो माहिती देण्यास आता आपण सुरुवात करुया. मित्रांनो एकंदरीत
- UPL Ulala / उलाला मध्ये घटक कोणता आहे?
- UPL उलाला ची किंमत आपल्याला काय पाहायला मिळू शकते?
- आणि उलाला योग्य प्रमाण काय वापरायला पाहिजे?
- व उलाला मध्ये नेमका कोणत्या कोणत्या इतर कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा वापर करू शकतो?
तर या संदर्भात माहिती घेणार आहोत.
UPL Ulala / उलाला मध्ये घटक कोणता आहे?
मित्रांनो सर्वात अगोदर जाणून घेऊया की याच्यामध्ये नेमकं घटक कोणता आहे?
शेतकरी बंधूंनो फ्लोनिकॅमिद 50 टक्के आपल्याला दाणेदार स्वरूपातलं एक कीटकनाशक पाहायला मिळतो.
मित्रांनो उलाला किंवा स्वाल कंपनीचं पणामा हे दोघेही कीटकनाशक एकच आहे. त्याच्यामध्ये दोन घटक आहे तर तो सेमच आहे. तुम्ही दोघांपैकी पणामा किंवा यापैकी कोणतीही कीटकनाशक फवारणी मध्ये वापरू शकता.
मित्रांनो याचा वापर केल्यानंतर नेमकं आपल्या कपाशीवरील कोणत्या कोणते किडींचा शंभर टक्के नियंत्रण होणार आहे?
उलाला चे फायदे ?
तर ते जाणून घेऊया मित्रांनो याचा वापर केल्याने आपल्या कपाशीवरील मावा तुडतुडे या मुख्य रस शोषण करणाऱ्या किडींवरती शंभर टक्के नियंत्रण होणार आहे. परंतु जो ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो. किंवा शेतकरी मित्रांनो पांढरी माशी म्हणतो. तर याच्या वरती आपल्याला या नियंत्रण किंवा कंट्रोल पाहायला मिळत नाही.
उलाला चे प्रमाण?
मित्रांनो एकंदरीत याच्या प्रमाणात जर विचार केला त्याचप्रमाणे आपल्याला प्रति एकरसाठी 60 ग्रॅम ते वापरणे गरजेचे आहे.
तुमचा पंधरा ते वीस लिटरचा पंप असेल तर,
आपल्याला प्रति पंपासाठी ६ ग्रॅम उलाला किंवा पणामा या कीटकनाशकांचे प्रमाण वापरणे गरजेचे आहे.
दुसरे चांगले कीटकनाशक?
दुसरे कोणते कीटकनाशक चांगले राहील किंवा बेस्ट राहिली तर, शेतकरी बंधूंनो तुम्ही बायर कंपनीचे रीएजंट या नावाचे कीटकनाशक येते. तर त्याच्यामध्ये फिप्रोनील ५% हा घटक आहे. या कीटकनाशकाचा आणि उलाला चा कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. रीएजंट च प्रमाण तीस ते चाळीस मिली पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी वापरू शकता.
उलाला मध्ये कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक चालेल?
मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचे चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक वापरू शकतात.
फवारणी मध्ये UPL कंपनीचे साफ हे बुरशीनाशक देखील वापरू शकतात. मित्रांनो याच्यामध्ये चांगल्या दर्जाचं कोणताही टॉनिक वापरू शकता. चांगल्या कंपनीचे टॉनिक तुम्ही फवारणी मध्ये वापरू शकतो. त्याच्या सोबत आपण चांगल्या दर्जाचं विद्राव्य सुद्धा फवारणी करताना वापरू शकता.
उलाला ची किंमत?
मित्रांनो एकंदरीत उलाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, याची किंमत आपल्याला किती पाहायला मिळू शकते? जर विचार केला तर 60 ग्रॅम UPL Ulala कीटकनाशक याची किंमत आपल्याला 500 किंवा साडेपाचशे किंवा 600 रुपयांच्या आसपास दुकानांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो चिंतेचा विषय जर केला तर आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या याची किंमत वेगवेगळी पहायला मिळू शकते.
लेख आवडला असला तरी खाली कमेंट करा. व इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
धन्यवाद
Kapus Bond Ali Upay? / कापूस बोन्ड अळी वर खात्रीशीर उपाय?
Thanks 960