मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे बरेचशे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेला आहे.
तरी या नुकसान भरपाईसाठी आपण कशा पद्धतीने पात्र व्हायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
शेतकरी बंधूंनो गेले दोन दिवसापूर्वी पासून विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावरती पिकांचा नुकसान झालेला आहे.
आणि अशा पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून पीक नुकसान भरपाईच्या संदर्भात पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब यांना आदेश दिलेले आहेत.
त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय यांच्याकडे देण्यात आलेले आहेत.