Sanman Dhan Yojana : सन्मान धन योजना 10,000 रु. मिळणार ! संपूर्ण माहिती

सन्मान धन योजना,sanman dhan yojana,

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर , सन्मान धन योजना – प्रत्येक वर्षी कामगारांना ₹10,000 थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत.

त्यासंदर्भात GR आलेला आहे.

नक्की कोणाला या योजनेचा लाभ मिळणार ? आणि कोण पात्र आहे ? हे आपण जाणून घेणार आहोत.

आजचा हवामान हवामान – येथे पहासन्मान धन योजना GR

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत, या कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत 6 मार्च 2024 चा हा GR आहे.

सन्मान धन योजना वय मर्यादा


महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अश्या घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना,

महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.


किती रुपये मिळणार ?

वयाची ५५ वर्ष पूर्ण केले आहेत असे जे काही पात्र घरेलू कामगार आहेत, त्यांनाही ₹10,000 एवढी रक्कम प्रतिवर्षी दिली जाणार आहे.


Sanman Dhan Yojana अटी व शर्ती


1) यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल, ते सदर योजनेसाठी पात्र नसतील.

2) लाभार्थीने अर्थसाहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने करून घ्यावी.

अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्या कार्यपद्धतीत जे काही सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांना आहे, जे लागू राहणार याचा उल्लेख करावा.

3) सदर अर्थसहाय्यचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थीच्या सोयीच्या
दृष्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.

वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे.


तर अशा पद्धतीने घरेलू कामगार जे आहेत ज्याची 55 वर्ष पूर्ण झाली आहेत त्याना प्रति वर्षी 10,000 रुपये त्याची जी काही रक्कम आहे.

त्याना अर्थसहाय्य म्हणुन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
जे कोणीही नोंदणीकृत कामगार असतील तर त्याना हा लाभ मिळणार आहे.


तर महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना नक्की share करा.

धन्यवाद…


महाराष्ट्रातील नवीन योजना – येथे पहा

स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा