Fertilizer News Update : खतं महाग होणार? रशियाकडून भारताला पुरवठा बंद


Fertilizer News

शेतकऱ्यांची चिंता वाढणारी बातमी आहे. जागतिक खत पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानं रशियाने भारताला डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते सवलतीच्या दरात देणं बंद केलं आहे. यामुळे येणाऱ्या काळात खतं महाग होण्याची शक्यता आहे, असं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलं आहे.

संपूर्ण महिन्याचा हवामान अंदाज : येथे पहा

गेल्या वर्षी रशिया हा भारताला सर्वात मोठा खतांचा पुरवठा करणारा देश बनला होता. हा पुरवठा सवलतीच्या दरात केला जात होता. मात्र, आता बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियाच्या कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळं भारतात खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

उदयाचा हवामान अंदाज : येथे पहा

जागतिक स्तरावर खतांचा पुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने रशियाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा ( Fertilizer ) पुरवठा करण्याची भूमिका रशियाने घेतली आहे. त्यामुळे भारतात खतांच्या किमती (Fertilizer Rate ) तसेच खतांवरील अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

रशियन कंपन्या डीएपी खतांमागे ८० डॉलर्स पर्यंत सवलत देत होती. मात्र आता ही सवलत ५ डॉलर्स पण मिळणार नाही, अशीही माहिती एका भारतीय कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. रशियन डीएपीची सध्याची किंमत भारतीय खरेदीदारांसाठी किंमत आणि मालवाहतूक (CFR) आधारावर प्रति टन अंदाजे ५७० डॉलर्स आहे. जी इतर आशियाई खरेदीदारांना दिली जाणारी समान किंमत आहे, असे एका रशियन उद्योग अधिकाऱ्याने सांगितले.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा


loan yojna : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चालू – अर्ज करा