Strawberry farming : अशी शेती स्ट्रॉबेरीची लागवड केली तर पडीक जमिनीत देखील चांगली पिकेल.


जर आपण एकंदरीत वातावरणानुसार विचार केला तर थंड हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करणे सोपे आहे.

परंतु सामान्य तापमान असलेल्या ठिकाणे पडीक जमिनीवर स्ट्रॉबेरी शेती करणे महत्त्वाचे असून यासाठी शेतकरी बांधव प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर करून चांगले उत्पादन मिळवू शकतात.

अशा भागांमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर यादरम्यान स्ट्रॉबेरीचा रोपांची लागवड केली जाते व डिसेंबर ते मार्च पर्यंत स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून चांगले उत्पादन हातात यायला लागते.

अशा ठिकाणी जर स्ट्रॉबेरीची लागवड करायचे असेल तर सगळ्यात आगोदर माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हव्या त्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे.

ही पद्धत ठरेल स्ट्रॉबेरी लागवडीसाठी फायद्याची

जर आपण स्ट्रॉबेरी या फळपिकाच्या विचार केला तर हे चिकन माती असलेल्या जमिनीमध्ये चांगली वाढते.

यामध्ये सुरवातीला लागवड केल्यानंतर वीस दिवस हलकेसे पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

जर एकंदरीत स्ट्रॉबेरी रोपांचा विचार केला तर दीड एकर क्षेत्रात 35 ते 40 हजार रुपयांची आवश्यकता भासते.

परंतु चांगले व्यवस्थापन केले तर त्यातून सहा ते सात लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

एकंदरीत लागवडीसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येऊ शकतो.

परंतु पाच महिन्यांमध्ये तीन ते चार लाखांचा निव्वळ नफा देखील मिळवता येतो.