केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे.
याअंतर्गत लोकांना आपला उद्योग सुरु करण्यासाठी छोट्या रक्कमेचे कर्ज दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू करण्यात आली.
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा
जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या सतावत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता SBI Mudra Loan.
मुद्रा योजनाच्या माध्यमातून विना गॅरंटी कर्ज मिळते.
त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.
मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.
कर्ज घेणाऱ्यांना एक मुद्रा कार्ड मिळते, त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो.
देशातील कोणीही व्यक्ती जो स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहे तो या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो.
जर तुम्ही सध्या असलेला व्यवसाय वाढवणार असाल व त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकता SBI Mudra Loan.
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा