मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रात लागु झाली आहे त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत आणि जो काहि याचा निर्णय आहे तो आज मंत्री मंडळात घेण्यात आलेला आहे.
Table of Contents
नक्कि काय काय निर्णय आहे आणि काय लाभ मिळणार आहेत ते आपण बघुया.
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय ०५ फेब्रुवारी २०२४ चा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे असे सांगण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून आता काय काय लाभ देण्यात येणार आहे ते बघुया.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ ?
● दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे. अशा ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
● ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी,आवश्यक
उपकरणे खरेदी करणे,तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी जे योजना आहे राबविण्यात येणार आहे.
● केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
● आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल .
● आणि पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एक-रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार ?
● केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते.
● मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.
● या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मंत्रिमंडळात देण्यात आलेली आहे.
● जर या योजनेचे ( vayoshri yojana) online form असतील किवा या विषयी काही माहिती जर आली किवा GR काही दिवसानंतर येइल तेव्हा माहिती या वेबसाईट वर येईल.
अशाच माहितीसाठी आपला Whatsapp group नक्की जॉईन करा.
धन्यवाद. Vayoshri yojana maharashtra
महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चालू – अर्ज करा