नमस्कार.
सर्वांना नव्या स्वरूपामध्ये लेक लाडकी योजना आणणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.
पिवळया आणि केशरी रेशनकार्ड धारक या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यानंतर थेट तिला ₹1,01,000 एवढा लाभ बँक खात्यातील लाभ दिला जाणार.
राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणा साठी लेक लाडकी योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे.
lek ladki yojna (किती लाभ मिळणार )
मुलीचा जन्म झाल्यावर ₹5000 पहिली मध्ये गेल्यानंतर 6000 सातवी मध्ये गेल्यानंतर 7000 हजार 11 वी मध्ये गेल्यानंतर ₹8000 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये अशा रितीने एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळेल आहे.
या संदर्भात संकल्प भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये घोषणा केली होती.
आता माझी कन्या भाग्यश्री योजना अधिकृत करुन 1 एप्रिल 2023 पासून पुढे जन्मणाऱ्या मुलींसाठी हि योजना राबविण्यात येईल .
लेक लाडकी योजनेचा उद्देश
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवीने,मुलींच्या शिक्षणास चालना देणे,मुलींचा मृत्यूदर कमी करणे, व बालविवाह रोखने यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळेल
1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळॆल.
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना याचा लाभ मिळेल.
यासंदर्भात 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा किंवा त्यानंतर दुसरी मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
आणि जुळया दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येणार आहे.
Lek ladki yojna : पात्रता
मात्र आई किंवा वडीलांनी नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे.
लाभार्थी कुटुंबा चे वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीने शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
धन्यवाद