kandachal Anudan Yojna : नमस्कार शेतकरी बंधूनो महाराष्ट्र राज्य शासनाने कांदा वखार/कांदाचाळ अनुदान योजना २०२३ साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे.
आपणाला जर कांदा वखार बांधायची असेल तर यामध्ये आपल्याला खात्रीशीर लाभ मिळणार आहे.शेतकरी बंधुंनो हि स्टेप सविस्तर पहा व जर आपल्याला या योजनेचा लाभ घेयचा असेल तर १००% आपण यामध्ये लाभ घेऊ शकता.
शेतकऱ्याच्या फायद्याचे जुगाड : येथे क्लिक करा.
कांदा चाळ अनुदान अर्थसहाय्य:
अ. क्र. | श्रमता . मे . टन | कमाल अनुदान रु. |
१ | ०५.०० | १७५०० |
२ | १०.०० | ३५००० |
३ | १५.०० | ५२५०० |
४ | २०.०० | ७०००० |
५ | २५.०० | ८७५०० |
कांदा चाळ आकारमान कसे असावे ?
अ .क्र . | श्रमता.मे.टन | लांबी /रुंदी मीटर | लांबी/रुंदी फूट |
---|---|---|---|
1. | 5 | 5.70*3.60 | 18.70*11.81 |
2. | 10 | 5.70*6.00 | 18.70*19.69 |
3. | 15 | 8.45*6.00 | 27.72*19.69 |
4. | 20 | 10.80*6.00 | 35.43*19.69 |
5. | 25 | 13.02*6.00 | 42.72*19.69 |
गाय/म्हैस गोठा योजना 100% अनुदान : येथे पहा
संपूर्ण कांदाचाळ बांधकाम कसे करावे:
कांदा चाळ अनुदान योजना उद्द्येश:
महाराष्ट्रामध्ये कांदा पिकाची लागवड जास्तीत जास्त अहमदनगर, नाशिक, पुणे ,सातारा ,कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यामध्ये केली जाते.
कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत देश हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात कांद्गयाची गरज भागून कांदा हा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो.
भारतामध्ये सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या पिकाच आहे आणि जवळ जवळ 74 लाख मॅट्रिक टन उत्पादन आपल्याला त्यामधून मिळते.
देशातील एकूण उत्पादनापेक्षा 26 टक्के कांदा हा महाराष्ट्र राज्यामध्ये घेतला जातो.
जर आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या भारत देश दहा लाख टन जर आपण कांदा निर्यात करत असेल तर त्यामधील सात लाख टन कांदा हा महाराष्ट्रामध्ये घेतला जातो.
कांदा हा नाशवंत आहे. संपूर्ण भारत देशामध्ये कांदा हा रोजच्या आहारामध्ये अत्यंत गरजेचे आहे.कांदा उत्पादित होण्याचे जास्त प्रमाण हे थंडी मध्ये आहे.
त्याच बरोबर कांदा हा उन्हाळी देखील केला जातो.अशा वेळी आपला कांदा हा जून ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी पर्यंत साठविण्याची नित्तांत गरज असते.
या कालावधीत नवीन कांदा कुठे उत्पादित होत नसतो. महाराष्ट्रामध्ये जर कांदा साठवून ठेवायचा असेल तर आठ लाख मॅट्रिक टन कांडा साठवून ठेवू शकतो एवढी महाराष्ट्र राज्याची क्षमता आहे.
त्यामुळे दिवसेंदिवस कांदा अत्यंत गरजेचा आहे.त्यामुळे कांदा साठवून ठेवणे गरजेचे आहे.
यासाठी कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा वखार शेतकरी वर्गात असणे आवश्यक आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन व संपून अनुदान मिळावे यासाठी शासनाने kandachal Anudan Yojna/ कांदा वखार /कांदा चाळ अनुदान योजना हाती घेतली आहे.
यामध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
या योजनेचा सर्वांना लाभ मिळावा व दीर्घकाळ कांदा टिकावा तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान न होता त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
kandachal Anudan Yojna : लाभार्थी निवड:
याची लाभार्थी निवड कशी होते तर या योजनेत आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाडीबीटी या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे.
त्यानंतर आपली निवड प्रक्रिया होते आणि मग आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि सातबारा असणे आवश्यक आहे.
सदर फॉर्म आपल्याला ऑनलाईन स्वरुपात भरायचा आहे.तो आपण महा इ सेवा केंद्र किंवा csc केंद्र यांचेमार्फत भरू शकता किंवा सदर फॉर्म हा घरी देखील भरू शकता.
कांदा चाळ अनुदान योजनेचे स्वरूप:
१) यामध्ये आपल्याला ५,१०,१५,२०,२५ टन पर्यंत क्षमतेच्या कांदा चाळीसाठी अनुदान मिळणार आहे.
२) कांदा चाळ बांधकाम हे आराखड्याप्रमाणे असणे आवश्यक आहे.
३) ७/१२ उताऱ्यावर कांदा नोंद असावी.
४) वैयक्तिक शेतकऱ्यास २५ टन पर्यंत कांदा वखार लाभ देण्याची तरतूद आहे.
तुम्हाला kandachal Anudan Yojna : कांदा चाल अनुदान योजना 2023 हि माहिती उपयुक्त वाटली असेल तर खालील व्हाट्सअँप बटन वर क्लिक करून नक्की शेयर करा.
गाय /म्हैस १००% अनुदान : येथे पहा