IFFCO Nano Urea Fertilizer Marathi /Nano urea purn mahiti / ईफको नॅनो युरिया खत पूर्ण माहिती?

IFFCO Nano Urea mahiti : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. शेतकरी कट्टा या वेबसाईट वर. शेतकरी मित्रांनो नॅनो यूरिया खरंच एक बॅग यूरिया ला रिप्लेस करू शकतो का? किंवा नॅनो यूरिया नेमकं काय आहे? कंपनीला फवारणी मधून नायट्रोजनयुक्त खत बनवलेल्या या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

आपण जर माहिती मुद्द्याचा विचार केला तर सर्वात अगोदर म्हणजे

  • नॅनो यूरिया चा योग्य वापर कशा प्रकारे करू शकतो?
  • IFFCO Nano Urea चा फायदा काय?
  • कोणत्या पिकावरती कोणती अवस्थेमध्ये कोणत्या स्टेज ला फवारणी केली तर फायदा होईल?

हे सर्व मुद्दे आपण आपल्या वेबसाईट वर पहिल्यांदाच पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपली शेती संदर्भात वेगवेगळ्या पिकासंदर्भात वेगवेगळ्या बुरशीनाशके कीटकनाशके आणि कथा संदर्भात सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत अतिशय चांगली आणि सोप्या भाषेमध्ये पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.

हे पण वाचा:
Fertilizer News Update : खतं महाग होणार? रशियाकडून भारताला पुरवठा बंद

कोणतेही प्रश्न असतील तर खाली कमेंट करायला विसरू नका.

नॅनो यूरिया इफको कंपनीने रिसर्च करून पेटंट करून ठेवलेले किंवा बनवलेले प्रॉडक्ट आहे.

तर ते आपल्याला सध्याच्या काळामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध झालेले पाहायला मिळते.

हे पण वाचा:
Agriculture Fertilizers Rate For Farmers : रासायनिक खतांचे नवीन भाव सरकार जाहीर केलेले खतांचे भाव

शेतकरी मित्रांनो यांच्यामध्ये घटकांचा विचार केला तर. याच्या मध्ये आपल्याला नायट्रोजन चे प्रमाण ४% असल्याचे पाहायला मिळते. परंतु शेतकरी मित्रांनो ते PPM फॉर्मुलेशन मध्ये मध्ये आहे. त्याच्यामुळे आपण विचार केला आपण दहा हजार छोटे छोटे दाणे करू त्या वेळेस एक PPM बनते.

एकदम चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध केलेली आहे.

लागू होण्यासाठी कालावधी?

मित्रांनो आपण यूरिया चा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपण टाकल्यानंतर कमीत कमी पाच दिवसानंतर आपल्या उपलब्ध होण्यासाठी सुरुवात होते. आणि यूरिया चा जर विचार केला की खरंच आपण जर 100 किलो युरिया आपल्या पिकाला टाकला तर 100 किलो यूरिया आपल्या पिकाला लागू होतो का? तर आपल्या 100 किलो युरिया मध्ये जास्तीत जास्त 40 ते 50 टक्के पर्यंत तुमच्या पिकाला उपलब्ध होतात. काही जमिनी मध्ये जास्तीत जास्त खोलपर्यंत आणि आपल्या पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. किंवा पोलुशन होतं ते ५०% पर्यंत फक्त लागू होतो.

हे पण वाचा:
Duplicate Fertilizers : नकली खते ओळखा 2 मिनिटात : युरिया/डीएपी/पोटॅश

परंतु आपण पार्टिकल मध्ये फवारणी मधून आपण ज्या लिक्विड स्वरूपात उपलब्ध झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यावर कंपनीने १०० पैकी 80& ते 85% पर्यंत लागू होण्याचे कंपनीने सांगितलेले आहे .म्हणजे आपण जर फवारणी मध्ये जर नॅनो उरेल चा वापर केला तर तर ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत ते आपल्या पिकाला लागू होते. PPM स्वरूपात असल्यामुळे आपण याचा वापर फवारणी मधून जर केला तर रित्या आपल्या पिकांमध्ये आपल्या त्या झाडाच्या पानांमध्ये जातात. आणि एकंदरीत जवळपास कमीत कमी चोवीस तासांमध्ये आपल्या झाडांमध्ये हरितद्रव्य वाढवण्याचं काम करतो.

शेतकरी मित्रांनो झटपट काम करण्यासाठी फवारणी मधून तुम्ही नॅनो यूरिया वापरू शकता.

IFFCO Nano Urea प्रमाण?

शेतकरी एकरासाठी आपल्याला कमीत कमी ५०० मिली प्रति अकरासाठी फवारणी मध्ये आपण वापर करू शकता.

हे पण वाचा:
Fertilizer : खत म्हणजे काय ? फायदे व नुकसान ?

ड्रीपद्वारे नॅनो यूरिया?

शेतकरी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ड्रीप द्वारे याचा वापर करू शकत नाही.

मित्रांनो ड्रीपद्वारे याचा वापर करू नका. हे शंभर टक्के होईल तेवढा फवारणी मधून वापर करा.

शेतकरी मित्रांनो माती मध्ये किंवा रेती मध्ये मिक्स करून तुम्ही डायरेक्ट फेकून देऊन वापर करू शकता.

IFFCO Nano Urea किंमत?

आपण विचार केला तर 500 मिली नॅनो यूरिया किंमत आपल्याला विचार केला तर अडीचशे रुपयाच्या आसपास किंवा 240 ते 250 रुपये आपल्याला कदाचित ते उपलब्ध होऊ शकले. मित्रांनो विभागानुसार, राज्यानुसार, जिल्ह्यानुसार त्याची किंमत दहा रुपये कमी जास्त असू शकते. मित्रांनो निश्चितच नॅनो यूरिया आहे तर ते कदाचित भविष्यामध्ये यूरिया ला रिप्लेस करू शकतो.

नॅनो यूरिया कोणत्या पिकांवर चालेल?

मित्रांनो तुमच्या इकडे यूरिया चा जास्तीत जास्त तुटवडा असेल,

तर तुम्ही त्याला निश्चितच नॅनो यूरिया ची फवारणी मध्ये तुमच्या कोणतेही पिकाला भरपूर जवळपास सर्वच पिकावरती करू शकता.

सर्वच पिकांवर नॅनो यूरिया चा ट्रायल घेतलेल्या आहेत. म्हणजे सर्वच पिकांवरती आपण त्याचा वापर करू शकतो.

आणि इफको ही गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट कंपनी आहे.

शेतकरी मित्रानो या कंपनी वरती इतर कंपन्यांच्या तुलनेत आपण तिच्यावर ती शंभर टक्के डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो.

नॅनो यूरिया केव्हा वापरावा?

मित्रांनो आपण आपल्या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो फळे लागल्यानंतर फुलं लागल्यानंतर आपल्या पिकाला यूरिया ची गरज खूप कमी प्रमाणात अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लागवड केल्यानंतर दहा दिवसानंतर 25 दिवसांनंतर 30 दिवसाच्या आसपास जास्तीत जास्त तुम्ही वापरू शकता. किंवा मी तुम्हाला सांगितलं माती मध्ये मिक्स करून रेती मध्ये मिक्स करून तुम्ही डायरेक्ट टाकून सुद्धा शंभर टक्के वापर केला तर निश्चितच फवारणी केल्याने तुमच्या पिकाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे काम नॅनो पार्टिकल्स करत असतात.

तर मित्रांनो जी नॅनो टेक्नॉलॉजी वापरून एकमेव ऍग्री क्षेत्रातील हा प्रॉडक्ट आहे जो नॅनो यूरिया आहे.

भरपूर साऱ्या इतर कंपन्या सांगतात कि आम्ही याच्यामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी वापरली आहे. परंतु आतापर्यंत एकही ॲग्रीकल्चर कंपनी प्रोडक्ट नाही त्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वापरली आहे. तरी समजत असेल पण त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रो टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सब मिक्रोटेक्नोलोजि याच्यापेक्षा जे पार्टिकल्स असतात तर ते त्याच्यामध्ये मोठेच असतात. परंतु जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर त्याचे दहा हजार छोटे छोटे पार्टीकल एखाद्यावेळेस करू आपण त्यावेळेस नॅनो टेक्नॉलॉजीचा किंवा एक मॉल्युकुल बनतो. शेतकरी एकंदरीत सोपे वाक्य मध्ये एकंदरीने तुम्हाला कशा प्रकारे त्याचा योग्य वापर, योग्य योग्य प्रमाण, तुम्हाला कोण कोणत्या पिकावर ती याचा वापर करायचा आहे? सुरुवातीच्या काळामध्ये नॅनो यूरिया चा फवारणी मधूनच तुम्ही वापर करा. म्हणजे तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या पिकांवर झटपट तिथे रिझल्ट पाहायला मिळतील.

तुम्हाला जर हा लेख आवडला असेल नक्की इतर शेतकरी मित्रांपर्यंयत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.

धन्यवाद ..

Kanda Rop khat Niyojan? / कांद्याच्या रोपासाठी खत व्यवस्थापन? / Kadyachya ropala konte khat dyave?

See All Posts..

Leave a Comment