👇 ह्युमिक ऍसिड लागणाऱ्या वस्तू 👇
1किलो गूळ , 1किलो तांदूळ, 10लिटर पाणी बसेल येवढे मडके, 200लिटर पण्याची टाकी.
👇 प्रक्रिया 👇
सर्वप्रथम आपल्याला एक किलो तांदूळ शिजवुन घ्यायचा आहे.
त्यानंतर तो तांदळाचा भात मडक्या मध्ये टाकून त्यामधे पाणी टाकायचे आहे.आणि त्या मडक्याचे तोंड सूती कापडाने ,दोरीने गच्च बांधून घ्यायचे आहे.
आणि ते मडके आपल्या शेतात किव्वा बांधावर पुरायचे आहे.
मडके पुरतान काळजी घ्यायची आहे की त्या ठिकाणी कोणतेही कीटक नाशक किंवा तन नाशक अथवा कोणतेही रासायनिक औषध अगर खात वापरलेले नसावे.
ते मडके पूर्णपणे जमिनीत गाडून त्याला तीन ते चार दिवस तसेच ठेवायचे आहेे.
चार दिवस झाल्यानंतर ते मडके काढून एका बकेटमध्ये ओतून घ्यायचे.
नंतर भात बारीक करून घ्यायचा आहे बारीक करून घेताना तो हातानेच करायचा आहे मिक्सर मध्ये न करता तो हाताने बारीक करायचा आहे.
नंतर एक किलो गुळाचे पाणी करून घ्यायचे आहे .
नंतर टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचे आहे.
त्या पाण्यामध्ये त्या भाताचे विर्जन आणि गुळाचे पाणी टाकायचे आहे.
त्या टाकीचे तोंड कापडाने कच बांधून दहा ते बारा तास तसेच ठेवायचे आहे.
10 ते 12 तास झाल्यानंतर ते आपण वापरू शकता
ते जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसाच्या आत मध्ये आपल्याला वापरायचे आहे.
👇 प्रमाण 👇
एका एकरला 200 लिटर पाणी जलशाचे तसे वापरायचे आहे.
आपण हे ठिबक द्वारे देऊ शकता किंवा पंपाच्या साह्याने ड्रिचिंग करू शकता.
याचा रिझल्ट आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर पाहायला मिळेल.
👇 कोण कोणत्या पिकावर वापरू शकतो ?👇
आपण हे विरजण कोणत्याही पिकाला किंवा फळबागेला देऊ शकता.
👇 मुख्य काम 👇
पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ करणे.