Ration Card : नमस्कार मित्रांनो भरपूर जणांच रेशन धान्य बंद होणार आहे, लवकर हे काम केलं नाही तर तुमचं देखील रेशन धान्य बंद होऊ शकत.
शेवटची तारीख ३ १ ऑक्टोबर २ ० २ ४ देण्यात आली आहे.
हे काम करा
तुम्हाला काय काम करायचं आहे ते जाणून घेऊया.
जे शिधापत्रिकेतील सदस्य मयत आहेत त्यांचे नाव शिधापत्रिकेतून आपण काढलं नाही, त्यांचे नाव काढायचे आहे.
त्यासाठी तुम्ही शिधावाटप कार्यालयात संपर्क साधू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- शिधापत्रिका
- मयत व्यक्तीचा दाखल
- आधार कार्ड
हे काम नक्की करा
आपल्या रेशन कार्डमधील जेवढ्या व्यक्ती आहे, त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे केवायसी (KYC) करणे सक्तीचे आहे.
जर तुम्ही सर्वांची केवायसी (KYC) केली नाही तर तुमचं, रेशन धान्य बंद होऊ शकत.
जे तुमचं रेशन दुकान आहे तिथं घरातील सर्वांचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे, व प्रत्येकाने आपला अंगठा द्यायचा आहे.
ज्या व्यक्तीचे व्हेरिफिकेशन होणार नाही, त्यांचे रेशन कार्डमधून नाव वगळण्यात येईल.
लवकरात लवकर जाऊन आपल्या घरातील सर्वांची केवायसी करून घ्या.
शेवटची तारीख Ration Card
KYC करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 देण्यात आली आहे,धन्यवाद.