बांधकाम कामगार योजना गृहउपयोगी भांडी सेट, 30 वस्तू
नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत कामगारांना भांड्याचा सेट हा सर्व जिल्हामध्ये वाटायला सुरुवात झाली आहे.
या गृह उपयोगी वस्तूमध्ये एकुण 30 वस्तु बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहेत.
भांड्याचा सेट नक्की कोणाला मिळणार आहे ?
या मध्ये किती वस्तु ?
आणि कोणकोणत्या वस्तु आहेत ? ते आपण जाणून घेणार आहोत.
Table of Contents
भांड्याचा सेट कोणाला भेटणार आहे ?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना गृहपयोगी वस्तू संच मिळणार आहे.
बांधकाम कामगार योजना योजनेच्या अटी व शर्ती :-
१. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय असणे गरजेचे आहे, तरच योजनेचा लाभार्थी राहील.
२. मागील वर्षी नोंदणी केली असेल तर, या वर्षी रिन्यूअल करणे गरजेचे आहे.
३. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) त्यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त किंवा जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे गरजेचे आहे.
काय काय मिळणार ? (bandhkam kamgar yojana)
- ताट – 04
- वाटया – 08
- पाण्याचे ग्लास – 04
- पातेले झाकणासह – 01
- पातेले झाकणासह – 01
- पातेले झाकणासह – 01
- मोठा चमचा (भात वाटपाकरीता) – 01
- मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) – 01
- पाण्याचा जग (२ लीटर) – 01
- मसाला डब्बा (०७ भाग) – 01
- डब्बा झाकणासह (१४ इंच) – 01
- डब्बा झाकणासह (१६ इंच) – 01
- डब्बा झाकणासह (१८ इंच) – 01
- परात – 01
- प्रेशर कुकर – ०५ लिटर (स्टेनलेस स्टील) – 01
- कढई (स्टील) – 01
- स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह – 01
- एकूण – ३० वस्तु बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहेत. -maharashtra bandhkam kamgar yojana
स्मार्ट शेतकरी – व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा