कोणत्या व्यवसायासाठी मिळेल कर्ज (Loan)?
Loan Scheme 2023 – किराणा दुकान, टेलिफोन बूथ, मोबाईल रिपेरिंग, इलेक्ट्रिक शॉप, भाजीपाला विक्री, फळ विक्री, हॉटेल, स्वीट मार्ट, भाजीपाला विक्री, मिरची कांडप, मसाला उद्योग
हेअर सलून, संगणक, हार्डवेअर पेंट शॉप, मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पावर टिलर, सायबर कॅफे, झेरॉक्स मशीन, ब्युटी पार्लर, पापड उद्योग, वडापाव विक्री, डीटीपी वर्क, ड्राय क्लीनिंग
गॅरेज, रेफ्रिजरेटर दुरुस्ती, मटन आणि चिकन शॉप, आईस्क्रीम पार्लर, मासळी विक्री इत्यादी व्यवसायांसाठी या महामंडळ योजना अंतर्गत कर्ज सुविधा मिळते.
व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे सगळ्यात आगोदर प्रश्न उभा राहतो तो लागणाऱ्या भांडवलाचा.
परंतु भांडवलाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अनेक छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत योजना राबवण्यात येतात.
याच पद्धतीने शासनाची एक महत्त्वाची म्हणजे वसंतराव नाईक महामंडळ योजना होय.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे स्वरूप
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज (Loan) योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करता यावा याकरिता एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येते.
ही योजना प्रामुख्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
या योजनेच्या माध्यमातून समाजातील भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जे काही नागरिक आहेत त्यांचे आर्थिक उन्नती व्हावी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करता यावे हा महत्त्वाचा उद्देश आहे
या योजनेअंतर्गत मिळणारे कर्जाचे स्वरूप
योजनेच्या माध्यमातून संबंधित प्रकल्पामध्ये मंडळाचा 100% सहभाग असतो व यासाठी एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येते.
जे कर्जदार नियमित कर्ज (Loan) परतफेड करतील अशा लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.
परंतु जर कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर लाभार्थ्याला दंडनीय स्वरूपाचा व्याजदर आकारण्यात येतो.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा