नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर.
मित्रांनो ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी काय करणे गरजेचे आहे ?
एक जबरदस्त खत व्यवस्थापन हे फक्त फुटव्या संदर्भात सांगणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या ऊस पिकाला करून घेणे गरजेचे आहे.
Table of Contents
ऊस फुटवे वाढीसाठी कोणत्या खतांचा वापर करावा?
ऊस फुटवे वाढीसाठी कोणत्या खतांचा वापर करावा हे खाली दिलेले आहे.
ऊसासाठी शेणखत/कोंबडी खत व्यवस्थापन
मित्रांनो आपण ज्या वेळेस ऊसाची लागवड करतो तर ऊसाची लागवड करतेवेळी आपल्याला प्रत्येक एकरासाठी 10 ते 15 टन शेणखत टाकणे तिथे गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्ही शेण खत टाकू शकता किंवा त्याच्यासोबत तुम्ही कोंबडी खत कोंबडी खताचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.
शेणखत किंवा कोंबडीखत आपल्याला 100 टक्के वापरणे गरजेचे आहे.
तुम्ही तर दुसरे खत कमी जरी वापरले तरी देखील चालेल.
ऊसासाठी सिंगल सुपर फॉस्फेट
त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस ऊस पिकाची लागवड करता तेव्हा आपल्याला प्रती एकरासाठी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत असते.
सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये स्फुरदची मात्रा जास्तीत जास्त असते. स्फुरदची मात्रा जास्त असल्यामुळे आपल्या कोणत्याही पिकाला फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी मदत होत असते.
ऊसाच्या पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी
नंतर प्रश्न येतो पांढऱ्या मुळ्यांचा विकास करणारे काही खत आपल्याला उपलब्ध असलेले पाहायला मिळतात.
यामध्ये Mycorrhiza हा घटक असतो.शेतकरी मित्रांनो ‘मायको रायझा’ हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचा कोणताही खत तुम्ही प्रति एकरासाठी 4 ते 5 किलो टाकू शकता.
टाटा रेली गोल्ड
त्याच्या मध्ये TATA कंपनीचे रेली गोल्ड नावाचे दाणेदार स्वरूपातला एक ‘मायको रायझा’ आहे. ते तुम्ही त्याचा वापर करणे गरजेचे आहे.
सिंगल सुपर फॉस्फेट सोबत मिळून तुम्ही हे टाकू शकता.
Koromandal Arithri (एरिथ्रि)
तसेच शेतकरी मित्रांनो कोरोमंडल कंपनीचा आपल्याला Arithri (एरिथ्रि) नावाचे एक Mycorrhiza पावडर स्वरूपातला उपलब्ध आहे. तर प्रति एकरासाठी 4 किलो तुम्ही तो देखील टाकू शकता.
Dhanuka MICORE (मायको रे)
किवा धानुका कंपनीच MICORE (मायको रे) या नावाने सुद्धा ‘मायको रायझा’ आलेल आहे. तर प्रति एकरासाठी 4 किलो ते 5 किलो तुम्ही तो देखील टाकू शकता.
निर्मल बायो पावर
किवा शेतकरी मित्रांनो NIRAMAL SEEDS COMPANY च BIO POWER (बायो पावर) नावाच बकेट येते 10 किलोची प्रति एकर साठी 1 बकेट किवा 2 बकेट टाकु शकता.
यासारखे खत व्यवस्थापन ज्या वेळेस आपण उसाची लागवड करतो त्या वेळेस टाकुन देणे गरजेचे आहे.
असे व्यवस्थापन केल्यास जबरदस्त ऊस फुटवे तुमच्या पिकाला झाल्या शिवाय राहणार नाही.
मित्रांनो ऊस फुटवे वाढवण्यासाठी हि माहिती आवडली असेल इतर शेतकरी मित्रांना नक्की SHARE करा.
धन्यवाद.
स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा
Queries Solve in Post
ऊस फुटवे वाढीसाठी उपाय
ऊस पीक खत व्यवस्थापन
ऊस पीक व्ययवस्थापन
उसासाठी कोणते खत चांगले आहे?