Power Tiller Subsidy Maharashtra Apply : पॉवरटिलर साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा – संपूर्ण माहिती

Maharashtra schemes, maharashtra yojna, महाराष्ट्र योजना, पावर टिलर योजना,power tiller yojna,

Power Tiller Subsidy Maharashtra Apply : MAHA DBT Portal | महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागणार आहे नंतर पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी प्रथम नवीन नोंदणी करावी लागणार आहे

महाडीबीटी पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

  • नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक गरजेचे आहे.
  • महाडीबीटी पोर्टल वरती आल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
  • आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये प्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव टाका.
  • वापरकर्त्याचे नाव या चौकोनामध्ये आपण आधार नंबर किंवा आपल्या आवडीनुसार वापरकर्ता नाव निवडू शकता.
  • पासवर्ड या चौकोनामध्ये आपण कोणताही पासवर्ड टाकू शकता. तसेच पासवर्ड पुन्हा टाका या चौकोनात पूर्वी टाकलेला पासवर्ड पुन्हा टाका.
  • आपल्याकडे ईमेल आयडी असेल तर आपण टाकू शकता.
  • ईमेल आयडी टाकल्यानंतर ईमेल आयडी तपासा या वरती क्लिक करा आपण दिलेल्या ईमेल आयडी वरती सहा अंकी एक ओटीपी जाईल हा ओटीपी व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर आपला सुरू असलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबरची सत्यता तपासण्या करिता ओटीपी मिळवा या वरती क्लिक करा.
  • दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी जाईल.
  • हा ओटीपी मोबाईल क्रमांक तपासण्या करिता ओटीपी टाका या चौकोनात मिळालेला ओटीपी टाका मोबाईल क्रमांकाचा ओटीपी तपासा या वरती क्लिक करा.
  • खालील चौकोना समोरील CAPTCHA भरा. आणि नोंदणी करा या वरती क्लिक करा.
    आपली नोंदणी यशस्वी झाल्यानंतर अर्जदार लॉगिन येथे तुम्ही येथे वापरकर्ता नाव आणि आधार क्रमांक या दोन्ही प्रकारे लॉगीन करू शकता.
  • आपण वापरकर्ता नाव आयडी लॉगिन पर्यायचा वापर करू. आपण निवडलेले वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाका.
  • खालील चौकोनात CAPTCHA भरून लॉगिन वरती क्लिक करा.
    आपण शेतकरी गट/एफपीओ संस्था म्हणून नोंदणी करु इच्छिता का? हा प्रश्न विचारला जाईल.
  • आपण शेतकरी म्हणून नोंदणी करणार असाल तर नाही हा पर्याय निवडा.
  • आपल्याकडे आधार क्रमांक आहे का? हा प्रश्न विचारला जाईल. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण नाही हा पर्याय निवडू शकता. परंतु आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपण होय हा पर्याय निवडा.
  • होय हा पर्याय निवडल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी हा पर्याय निवडा.
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक हा पर्याय निवडा यासाठी आपल्याकडे बायोमेट्रिक डिव्हाईस असणे गरजेचे आहे.
  • आपल्याकडे बायोमेट्रिक डिव्हाईस नसेल तर आपण सीएससी केंद्र किंवा ऑनलाईन सर्विसेस सेंटर, महा ई सेवा केंद्र वरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करू शकता.
  • प्रमाणीकरण झाल्यानंतर पुन्हा होमपेजवर ती यावे लागेल, लॉगिन या पर्यायावर क्लिक करा, वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रथम प्रोफाईल भरावी लागेल यामध्ये आपले संपूर्ण नाव, पॅन कार्ड नंबर, बँक खाते नंबर, आयएफएससी कोड, तसेच रहिवासी पत्ता, कायमचा रहिवासी पत्ता आणि सातबारा उतारा उतारा यावरील माहिती भरावी लागेल.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

प्रोफाईल वरील माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या, कारण एकदा आपली योजनेसाठी निवड झाल्यानंतर आपण पुन्हा अर्जा मध्ये किंवा प्रोफाईल मध्ये काही बदल करू शकत नाही.

आपण जर चुकीची माहिती दिलेली असेल तर आपल्याला अर्ज बाद करून पुन्हा नवीन अर्ज भरावा लागेल.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

  • पॉवर टिलर Power Tiller या घटकासाठी अर्ज करण्यासाठी मुख्यपृष्ठ वरती क्लिक करा.
  • अर्ज करा या वरती क्लिक करा, कृषी यांत्रिकीकरण यामध्ये बाबी निवडा वरती क्लिक करा.
  • हे घटक या चौकोनामध्ये कृषी औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
    तपशील यामध्ये पॉवर टिलर हा पर्याय निवडा.
  • एचपी श्रेणी मध्ये ८ बीएचपी व त्यापेक्षा जास्त हा पर्याय निवडा.
  • खालील अटी समोरील चौकोनात क्लिक करा आणि जतन वरती क्लिक करा.
  • पुन्हा मुख्यपृष्ठ वरती क्लिक करा आणि अर्ज करा वरती क्लिक करा.
  • अर्ज सादर करा या वरती क्लिक करा पुन्हा पहा वरती क्लिक करा यामध्ये प्राधान्यक्रम निवडा.
  • खालील अटी समोरील चौकोनात क्लिक करा आणि अर्ज सादर करा वरती क्लिक करा.
    अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचे पेमेंट करावे लागेल यामध्ये आपण क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यु पी आय आणि क्यूआर कोड, याद्वारे पेमेंट करू शकता.
  • पेमेंट झाल्यानंतर आपला अर्ज सादर केला जाईल पुन्हा मुख्यपृष्ठ वरती या मी अर्ज केलेल्या बाबी मध्ये जाऊन अर्जाची पोहोच पावती पाहू शकता.” Power Tiller Subsidy Maharashtra”

अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Yojna : विहीर १००% अनुदान ४ लाख रु – अर्ज चालू – येथे पहा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा