पंजाब डख हवामान अंदाज : Panjabrao dakh weather today March 2024

Panjabrao dakh, Panjabrao dakh weather today, पंजाब डख, पंजाब डख हवामान अंदाज,

नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी

आजपासून खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.

कारण की पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी हरभरा,गहू,भात काढणी चालू आहे. म्हणून खासकरून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे .

हवामान अंदाज व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा



या भागात गारपीट – Panjabrao dakh

पूर्व विदर्भामध्ये 17 मार्च 18 मार्च, 19 मार्च,20 मार्च दरम्यान गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागामध्ये काही भागांमध्ये गारपीट होणार आहे, म्हणून तेथील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी.

त्यानंतर तो पाऊस पूर्व विदर्भापासून पश्चिम विदर्भापर्यंत येणार आहे.

विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच यवतमाळ नांदेड पर्यंत पाऊस येईल.

त्यानंतर हिंगोलीच्या जवळ थोडा येणार आहे. त्यानंतर अमरावती,अकोट,अचलपूर,मुरूड या भागापर्यंत पाऊस येणार आहे.

पुढील महिन्याचा हवामान अंदाज – येथे पहा


अकोला,बुलढाणा पर्यंत थोडा पाऊस येणार आहे.

म्हणजे पश्चिम विदर्भाकडे जास्त पाऊस येणार नाही.

बुलडाण्यापासून पुन्हा अकोल्याकडे पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे.

अमरावती,अचलपूरकडे पाऊस जास्त वाढत जाणार आहे.

वर्धा,नागपूरमध्ये,चंद्रपूरच्या पूर्व भागामध्ये गारपीट होणार आहे. – Panjabrao dakh


या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होणार

छत्तीसगड कडे तर खूपच मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे. म्हणून छत्तीसगढच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा .


पूर्व विदर्भात जास्त पाऊस, पश्चिम विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार.

मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,कोकण पट्टी अंदाज

17 मार्च 18 मार्च,19 मार्च ,20 मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.

21 मार्च पासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहेत. म्हणजे 40,41 अंशाच्या पुढे वर पारा वाढत जाणार आहे.

म्हणून वृद्धांची काळजी घ्या. लहान मुलांची काळजी घ्या कारण की उन्हाचा पारा 42 अंशांच्या पुढे जाणार आहे.


अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन अंदाज दिला जाईल.
धन्यवाद – Panjabrao dakh