Mini tractor Scheme : शेतकऱ्यांना मिळणार आता 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ही शेवटची तारीख.


शेतकऱ्यांना फायदा होईल अशी एक योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून

योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जाणार असून

ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या इतर उपकरणांवरदेखील अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- सदर बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे गरजेचे आहे.

2- तसेच बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती आणि नव बौद्ध घटकातीलच राहणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.

3- या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखला सादर करणे बंधनकारक आहे.

4- ज्या कोणी या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल अशा व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

👇 अर्ज करण्याची शेवटची तारीख 👇

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी यासाठी 23 डिसेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान सोलापूर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले असून या योजनेच्या बचत गटांचे उत्पन्न वाढवता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.