CBSE Udan Yojna Mahiti : सीबीएसई उडान योजना संपूर्ण माहिती

Cbse udan yojna, CBSE उडान योजना, मुलींसाठी योजना,

CBSE Udan Yojna Mahiti : सीबीएससी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना मुलीसाठी राबवली जात आहे.

या योजनेमध्ये तंत्र शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी, आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांना प्रोस्ताहन मिळावे. हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत जी मुली दहावीत सरासरी 70 टक्के आणि गणित व विज्ञान विषयात 80 टक्के मार्क्स मिळवलेली कोणतीही मुलगी या योजनेसाठी पात्र ठरू शकते.

ज्या मुलींची या योजनेमध्ये निवड होईल अशा मुलींना 11वी, 12वी साठी मोफत कोर्स मटेरियल ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाते.

मुलीच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते अभ्यासामध्ये मदत केली जाते.

मुलींच्या जे काही अभ्यासा संदर्भातले समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध केला जातो.

मुलींना योग्य त्या करियर च्या संदर्भात संधी उपलब्ध करून दिल्या जातात.