रेशन कार्ड धारकांना खुशखबर..!!!
नमस्कार स्वागत आहे आपले स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे.
गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तुम्हाला आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे? कधी मिळणार ? कोणाला मिळणार ? त्यासंदर्भातला जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया.
महाराष्ट्रातील नवीन योजना – येथे पहा
Table of Contents
शासन निर्णय
राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्य़ातील दारिद्रयरेषेवरील एपीएल (APL) म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना खालील वस्तू मिळणार आहेत.
काय काय मिळणार ?
1 किलो रवा,1 किलो चना डाळ,1 किलो साखर,1 लिटर तेल हा आनंदाचा शीधा लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
आनंदाचा शिधा कधी मिळणार ?
हा शिधा कधी मिळेल तर 15 एप्रिल नंतर दिला जाईल. या संदर्भातला 1 ते 2 दिवसात GR येईल म्हणजेच शासन निर्णय प्रकाशित होईल.
आनंदाचा शिधा कोणाला मिळणार ?
जर तुम्हाला अगोदर “आनंदाचा शिधा” मिळाला असेल तर हा “आनंदाचा शिधा” तुम्हाला मिळणार आहे.
सुमारे 1.69 कोटी पत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे आणि यासाठी 550 कोटी 57 लक्ष इतक्या खर्चाची मंजुरी सुद्धा शासनाने दिली आहे.
राज्यात सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आहेत आणि 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक आहेत.
तर हि महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
धन्यवाद.
स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा