दुधातील फॅट (Milk Fat) चे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी उपाय
जनावरांच्या आहारात एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच कडबा किंवा वैरणीचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे आवश्यक आहे.
दूध फॅट कमी होण्याची कारणे : येथे पहा
दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त 12 तासांचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल, परंतु दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा.
दूध फॅट कमी होण्याची कारणे : येथे पहा
दुधाळ जनावरांना आहारातून एकूण ६५ ते ७५ टक्के कडब्याचे प्रमाण मिळाले पाहिजे. जेणेकरुन जनावराच्या रुमेनमधील फायबर मॅट म्हणजे तंतुमय जाळे तयार होण्यास मदत होते.
त्यामुळे कोटी पोटातील तंतुमय घटकाचे विघटन होऊन दुधातील फॅटचे (Fat) सातत्य टिकून राहते.
अजून काही उपाय फॅट (Milk Fat) टिकवून ठेवण्यासाठी
दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध (Milk) काढून घेण गरजेचं आहे.
दूध फॅट कमी होण्याची कारणे : येथे पहा
दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे आनुवंशिकता किंवा जनावराची (Animal) जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचे प्रमाण ठरते.
दूध फॅट कमी होण्याची कारणे : येथे पहा
दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे दुधातील फॅट (Milk Fat) चे प्रमाण कमी होते. दुधात पाण्याची भेसळ केली असता, दुधातील घन घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच, दुधाची भुकटी मिसळून भेसळ केली असता दूध घट्ट दिसते, पण फॅट (Fat) कमी लागते.
Yojna : महाराष्ट्रातील नवीन योजना माहिती : येथे पहा