देशातील बाजारात आजही कापूस दबावात होता. दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली. मात्र दरपातळी वाढली नाही.
आजही कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. काही बाजारांमध्ये कमाल दर काहीसे वाढले होते.
कापसाचे भाव कधी वाढणार : येथे क्लिक करा.
पण सरासरी दरपातळी कायम होती. तर गाठींचे भावही ६२ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. एक कापूस गाठ ३५६ किलोची असते. क्विंटलमध्ये रुईचा भाव १७ हजार ४१५ रुपये होतो.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, कापसाचे म्हणजेच रुईचे प्रत्यक्ष खरेदीतील दर अर्थात काॅटलूक ए इंडेक्स १०२ सेंट प्रतिपाऊंडवर होता.
रुपयात सांगायचं झालं तर १८ हजार ४४७ रुपये प्रतिक्विंटल दर होता. मात्र देशातील रुईचा भाव १७ हजार ४१५ रुपये होता.
म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईचे प्रत्यक्ष खरेदील दर देशातील दरापेक्षा १ हजार ३२ रुपयांनी जास्त आहेत. म्हणजेच देशात कापसाचे भाव जास्त असल्याचा दावा चुकीचा आहे.
कापसाचे भाव कधी वाढणार : येथे क्लिक करा.