Cotton Rate : कापूस व सोयाबीन चे भाव वाढण्याची शक्यता / आजचे बाजारभाव

कापूस बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव,

देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीन दबावात असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन, सोयापेंड आणि कापूस दरात सुधारणा झाली.

आजचे बाजारभाव : येथे क्लिक करा

पण देशातील शेतकऱ्यांना मात्र दरवाढीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कापूस आणि सोयाबीनचे भाव पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

कापसाचा विचार करता, दरवाढीस पोषक स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनसह इतर देशांकडून कापसाला मागणी वाढत आहे. त्यामुळं कापसाचे दर वाढले.

परिणामी भारतातून कापूस निर्यातही वाढली. तसंच देशातील कापसाचे वायदेही सुरु होण्याचा अंदाज आहे. यामुळं पुढील काही दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढू शकतात.

आजचे बाजारभाव : येथे क्लिक करा

देशातील स्थिती पाहता सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

तर कापसाचे दर ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहतील. त्यामुळं शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढले आहेत. त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात वाढली. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. याचा देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो.

टप्प्याटप्प्याने कापूस आणि सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले.

आजचे बाजारभाव : येथे क्लिक करा