Sugercane Farming : ऊस शेतीत आत्मसात केले एकरी १०० टनांपुढे उत्पादन


सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीपासून १०-१२ किलोमीटरवर बेंबळे गाव आहे.

भीमा नदीचा काठ आणि उजनी धरणाच्या कालव्यामुळे गावपरिसराला पाण्याचा शाश्‍वात स्रोत मिळाला आहे.

दर्जेदार बेणे निवड, बीजप्रक्रिया (Seed Treatment), माती परीक्षणातून सेंद्रिय- रासायनिक खतांचा एकात्मिक वापर, लागवड पध्दत आणि शास्त्रज्ञांसह अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन.

या आधारे उसाचे सातत्याने एकरी शंभर टन व त्यापुढे उत्पादन घेण्याचे तंत्र बेंबळे (जि, सोलापूर) येथील सोमनाथ हुलगे (Somnath Hulge) यांनी विकसित केले आहे.

👇 उत्पादन 👇


एकरी सुमारे ५८०० डोळे बसतात.

तर पुढे गाळपयोग्य उसाची संख्या ३५ हजार ते ४० हजारांपर्यंत मिळते. प्रति उसाचे वजन अडीच ते तीन किलो गृहीत धरले तरी एकरी १०० ते १२० टनांपर्यंत उत्पादन मिळते असे गणित तंत्रामागे आहे.

त्यातून सलग तीन वर्षांत सोमनाथ यांनी उत्पादनात चांगला हातखंडा मिळवला आहे.

सन २०२१ मध्ये एकरी ११० टन, २०२२ मध्ये ११७ टन आणि पंधरवड्यापूर्वी १२५ टन उत्पादन घेण्यात त्यांनी यश मिळवले आहे.