राजशेखर पाटील यांनी बांबूची 40 हजार रोपे आणून शेताच्या बांधावर लावली.
त्यांनी याचे योग्य व्यवस्थापन केले. 2 वर्षात त्यापासून 10 लाख बांबू तयार करण्यात आले.
ते राजशेखर यांनी 20, 50 आणि 100 रुपयांना विकले होते.
अशा प्रकारे त्यांची उलाढाल अवघ्या 2 वर्षात एक कोटी रुपयांवर पोहोचली.
यानंतर त्यांनी आणखी बांबू आणून त्यांच्या संपूर्ण शेतात लावले. यामुळे त्यांचे हे काम वाढतच गेले.
असे असताना आता त्यांच्याकडे दरवर्षी 1 कोटी बांबू तयार आहेत.
त्यांची उलाढाल 6-7 कोटी रुपये आहे.
बांबूने राजशेखर पाटील यांचे नशीब बदलले आहे.
यानंतर राजशेखर पाटील यांनी भारतभरातून मिळणाऱ्या सर्व उत्तमोत्तम बांबूच्या जाती आणून आपल्या शेतात लावल्या आहेत, अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देण्यासाठी येत असतात.