NAMO Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या दिवशी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते , 26 ऑक्टोबर रोजी शिर्डीतल्या कार्यक्रमाच्या क्षणी, लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.
राज्यात एकूण 93.07 लाख शेतकरी या योजनेचा लाभार्थी आहेत. या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 1720 कोटी रुपयांची निधी मान्यता दिली आहे.
पहिल्या हप्त्याच्या वितरणासाठी कृषी विभागाने पडताळणीसाठी केलेल्या दिरंगाईमुळे आणि महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे पहिल्या हप्त्यासाठी विलंब झाल्याचे सांगण्यात आहे.
राज्यातील 85.60 लाख शेतकऱ्याला पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळाला. परंतु, कृषी विभागाच्या अभिलेखाची तपासणी केल्यानंतर, लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख झाली आहे.
अखेरीस, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित केली आहे. आता शेतकरी लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचा लाभ गुरुवार पासून मिळणार आहे.
Yojna : मोटर पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदान – अर्ज करा