आजचा हवामान अंदाज – पंजाब डख
पंजाब डख : राज्यात सध्या पाऊस येणार नाही, फक्त अंशतः ढगाळ वातावरण असणार.
जवळपास २ ० फेब्रुवारी २ ० २ ५ पर्यंत पावसाचे वातावरण तयार होणार नाही.
५ फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे, फक्त वातावरण अंशतः ढगाळ राहणार.
राज्यामध्ये रात्री १ १ पर्यंत गरमी जाणवणार, १ २ ते सकाळी ७ पर्यंत थंडी राहणार, दिवसा ऊन तापणार.
यावर्षी उन्हाळा देखील कडक जाणार.
ज्या शेतकर्यांचे हरभरा काढणी चालू आहे, ते काढू शकता.
ज्यांचे कांदा काढणी चालू आहे ते कांदा काढु शकता.
ज्यांचा गहू काढायचा आहे, त्यांना गहू काढायला हरकत नाही.
राज्यात सध्यातरी पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.