Hardhenu cow : दिवसाला 50 ते 55 लिटर दूध देणारी गाय.


गाई पालनात यशस्वी व्हायचे असेल तर गाईच्या सुधारित जातींचे पालन करण्याची शिफारस हि केली जाते.

म्हणुन आज आपण गाईच्या एका संकरीत जातीविषयी जाणुन घेणार आहोत.

या संकरीत जातीच्या गाईचे नाव आहे हरधेनू गाय.

हि गाय लाला लजपत राय पशु विज्ञान विद्यापीठाणे तयार केली आहे.

ह्या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हि गाय तीन जातीच्या गाईपासुन तयार करण्यात आली आहे.

चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया ह्या गाईच्या विशेषताविषयी

👇 हरधेनू गाईविषयी अल्पशी माहिती 👇


जसं की आपण आधीच बघितले की, हरधेनू गाय हि तीन जातीच्या गाईपासुन संकर करण्यात आली आहे.

त्या तीन जाती आहेत, उत्तर-अमेरिकन (होलस्टीन फ्रिझेन), देशी हरियाणा आणि साहिवाल.

या जातीच्या गाईमध्ये 62.5 टक्के रक्त उत्तर-अमेरिकन या विदेशी गाईचे आहे तर 37.5 टक्के रक्त हे हरियाणाच्या देशी जातीचे आणि साहिवाल ह्या देशी जातीचे आहे.

हि गाय हि इतर गाईच्या तुलनेत अधिक जलद गतीने वाढते. तसेच हि देशी गाईच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे.

👇हरधेनू गाय किती देते दुध 👇

या जातींचे पालन करून पशुपालक शेतकरी चांगली मोठी कमाई करू शकतात.

शेतकरी मित्रांनो अनेक पशुपालक शेतकरी सांगतात की, इतर गावठी व देशी गाईपेक्षा ही गाय खूप चांगली आहे आणि या गाईचे पालन हे फायदेशीर ठरेलं.

आपली देशी जात हि दररोज सरासरी 5-6 लिटर दूध देते.

आणि हि संकरीत हरधेनू गाय दररोज सरासरी 50-55 लिटरपर्यंत दूध देते.

म्हणजे या गाईचे पालन दुध उत्पादणासाठी सर्वोत्तम आहे.

👇 हरधेनू गाईचा आहार 👇


शेतकरी मित्रांनो या गायीचा खुराक अर्थात आहार हा इतर गाईसारखाच आहे.

हि हरधेनू गाय एका दिवसात सुमारे 40-50 किलो हिरवा चारा खाते.

तसेच हि गाय एका दिवसात 4-5 किलो कोरडा चारा खाते.

👇कुठे मिळते सीमन 👇


शेतकरी मित्रांनो जर कोणाला या जातीच्या गायीचे वीर्य अर्थात सीमन विकत घ्यायचे असेल तर आपण लाला लजपत राय अ‍ॅनिमल युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता.

यासाठी आपण विद्यापीठाच्या 0166- 2256101 आणि 0166- 2256065 या लँडलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता.