Cotton Rate : कापूस दरवाढीसाठी थोडी वाट पहावी लागेल


देशातील काही बाजारांमध्ये कापूस दरात (Cotton Rate) आज काहीशी वाढ पाहायला मिळाली.

पण शेतकऱ्यांना अपेक्षित दरपातळी आजही झाली नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरुच आहेत.

पण कापूस दर वाढण्याची शक्यता आहे. देशातील बाजारात पुढील काही दिवसांमध्ये दरवाढ दिसेल.

हे पण वाचा:
Best 5 Crop : फेब्रुवारी मार्च महिन्यात बाजारभाव असणारी हि पिके लावा

त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस दरवाढीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

यंदाही देशातील कापूस उत्पादन घटलं. गेल्या हंगामातील शिल्लक साठाही खूपच कमी आहे.

त्यामुळं पुरवठा साखळीत मर्यादीत कापूस उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनीही कापूस रोखून धरला.

हे पण वाचा:
Agriculture Fertilizers Rate For Farmers : रासायनिक खतांचे नवीन भाव सरकार जाहीर केलेले खतांचे भाव

तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

चीनकडून कापसाला मोठी मागणी येऊ शकते.

यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतील. याचा आधार देशातील बाजारालाही मिळू शकतो.

हे पण वाचा:
Lpg gas : गॅस सिलेंडर चे दर तब्बल एवढ्या रुपयांनी झाले स्वस्त