आपण महागड्या भाज्यांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला हिमालयात उगवणाऱ्या केशर किंवा जंगली मशरूमची नावे लक्षात येतात.
पण, एक भाजीही आहे जी किमतीच्या बाबतीत त्यांना मात देऊ शकते.
व्हिडिओ पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
भाजीचे नाव
या भाजीचे नाव हॉप शूट्स (hop shoots) असं आहे, जी युरोपियन देशांमध्ये लोकप्रिय आहे आणि ही जगातील सर्वात महाग भाजी आहे.
ह्या भाजीजी किंमत ?
औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भाजीची किंमत सुमारे 85 हजार रुपये प्रति किलो आहे.
ही भाजी भारतात सामान्यपणे पीकवली जात नाही.
हॉप-शूट्स इतकी महाग आहे की याच्या बदल्यात थेट सोन्याचे दागिने देखील खरेदी करू शकतो.
व्हिडिओ पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
हॉप-शूट्सचे आरोग्यसाठी फायदे
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ही भाजी टीबी विरूद्ध अँटीबॉडीड तयार करू शकते.
याशिवाय ही भाजी चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, अटेंशन डेफिसिट-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD), चिंताग्रस्तपणा आणि चिडचिडेपणा असा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
बीअर बनवण्यासाठी देखील हॉप-शूट वापरतात. हॉप-शूट्सचा वापर अनेक अन्न-पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.
ही भाजी इतकी महाग का आहे?
हॉप-शूट्स औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत तसेच काढणीसाठी तयार होण्यासाठी याला तीन वर्षे लागतात.
याशिवाय, ते तोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, कारण त्यात कोणतेही मशीन वापरले जात नाही.
हॉप-शूट्स काढताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. याचा उत्पादन खर्च आणि याच्या लागवडीत घ्यावी लागणारी काळजी यामुळेच याची किंमत इतकी जास्त आहे.