👇 गाळ माती टाकण्याचे फायदे 👇
1) तलावांमध्ये किंवा धरणांमध्ये जो काही गाळ जमा होतो, त्यामध्ये अन्नद्रव्य आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांना त्याचा फायदा होतो.
2) त्यांच्या निरोगी वाढीसाठी व चांगल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून गाळमाती खूप फायद्याचे ठरते.
3) जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजे धारणक्षमता जर कमी असेल तर अशा जमिनीत गाळ टाकल्यामुळे संबंधित जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
4) समजा तुम्ही ज्या जमिनीत गाळ टाकणार आहात ती जमीन जर हलकी व मध्यम असेल तर अशा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व पिक उत्पादन चांगले येण्यासाठी गाळ मातीचा खूप उपयोग होतो.
5) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाळ टाकल्यामुळे जमिनीतील स्फुरद, सेंद्रिय कर्ब व पालाश इत्यादी महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते व पिकांचे उत्पादन खूप चांगले येते.