Panjab cows Secrets : पंजाब च्या गायी जास्त दूध देतात आणि आपल्या गायी का कमी ?


शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय ओळखला जातो.

पंजाब मधील पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी अनेक गोष्टी करतात.

  • दूध काढण्यापूर्वी गोठ्यात मधुर संगीत लावतात. दूध काढण्याआधी गाई धुवून त्या वाळण्यासाठी रेस्टिंग जागेमध्ये थांबवतात.
  • दूध काढण्यापूर्वी गाई-म्हशी पूर्णपणे पान्हवून घेतात.जास्त दूध देणाऱ्या गाईंच्या दिवसातून तीन वेळा धारा काढल्या जातात.
  • दूध काढण्याची क्रिया ७ ते ८ मिनिटांत पूर्ण करतात.दूध काढण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर कासेतील दूध पूर्णपणे निघल्याची खात्री करतात.
  • सकाळी व संध्याकाळी दुध काढण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळतात.
  • धार काढण्याच्या वेळी मिल्कर शिवाय मिल्किंग पार्लर मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
  • धार काढतांना दररोज मिल्किंग मशीन चे प्रेशर तपासले जाते.
  • जनावराला वाढीच्या स्थितीनुसार खनिज मिश्रणे व जीवनसत्वे पुरवली जातात.
  • छोट्या-छोट्या गोठ्यामध्ये धार काढण्यापूर्वी गाईची कास नेहमी कोमट पाण्याने धुवून त्यानंतर ती चांगली पुसली जाते.
  • छोट्या गोठ्यामध्ये दूधाचे कॅन धुण्यासाठी मोठे ब्रश वापरले जातात व ते कॅन ड्रायरखाली किंवा उन्हात वाळवले जातात.

गायीच्या दूध आणि शेणाच्या पैशातुन बांधला तब्बल एक कोटींचा बंगला


  • मिल्किंग पार्लर मुळे एक व्यक्ती सात मिनिटात ३,६,९,१२ पेक्षा जास्त गाईंची धार एकावेळी काढतात.
  • दूध काढण्यासाठी खास करून मिल्किंग पार्लर बनवले जातात.मिल्किंग पार्लर मध्ये धार काढताना गाई अजिबात हालत नाहीत.
  • जनावरांच्या पायाला भाला घालण्याची सवय अजिबात नसते.
  • धार काढताना गाईला चारा व पशू आहार दिला जात नाही तर तो धार काढून झाल्यावर जनावरांना टी.एम.आर दिला जातो.
  • धार काढताना दररोज दुधाची चव, रंग, वास तपासून पहावा शंका वाटल्यास दूध दुसऱ्या गाईच्या दुधात मिसळू नये.
  • स्तनदाह आजार झालेली गाई लगेच गोठ्यातून वेगळी केली जाते त्या गाईचे दुध मिल्किंग मशीन ने न काढता हाताने काढले जाते व काढलेले दूध फेकून दिले जाते.मशीन ने धार काढल्यामुळे सडांची लांबी व कासेचा आकार वाढत नाही तसेच सडाला इजा ही होत नाही.
  • दूधाची साठवणूक ते मिल्क बल्क कुलर मध्ये करतात तसेच स्पर्श विरहित दूध असल्याने दूध लवकर खराब होत नाही.
  • धार काढून झाल्यावर गाई-म्हशींचे सड न चुकता दररोज जंतुनाशक द्रावणामध्ये बुडवले जाते.
  • गाई-म्हशींची खूरे वाढलेली असतील तर हुफ ट्रिमिंग किंवा हुफ बॅलन्सिंग केले जाते.गाई व म्हशीच्या अंगावर केस जास्त प्रमाणात झाले असतील तर ते ट्रिमर ने काढून घेतले जातात.