Purple Tomato : तुम्ही जांभळे टोमॅटो पाहिले आहे का ?


टोमॅटो म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लाल रंगाचे रसरशीत टोमॅटो (Tomato) येतात. टोमॅटो शाकाहारी तसेच मांसाहारी अशा सर्वच प्रकारच्या लोकांच्या रोजच्या आहारातील महत्वाची फळभाजी आहे. आकर्षक लाल हिरव्या रंगामुळे टोमॅटो दिसायला सुंदर असतातच शिवाय त्याची चवही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. तर असे हे आरोग्यदायी टोमॅटो जांभळ्या रंगात मिळाले तर. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) अॅनिमल अँड प्लांट हेल्थ इन्स्पेक्शन सर्व्हिस विभागाने जांभळ्या रंगाच्या टोमॅटोची (Purple Tomato) नविन जात विकसित केली आहे.

जांभळ्या टोमॅटोचा वास आणि चव

या जांभळ्या टोमॅटोचा वास आणि चव लाल टोमॅटोसारखीच आहे. पण जांभळे टोमॅटो लाल टोमॅटोपेक्षा जास्त आरोग्यदायी आहेत असं आभ्यासातून दिसून आलं आहे. तसेच हे टोमॅटो जास्त काळ टिकतात. कर्करोगासारख्या आजारावरही हे टोमॅटो प्रभावी आहेत असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

हे पण वाचा:
White onion marathi : पांढऱ्या कांद्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल चांगला नफा – जाणून घ्या संपूर्ण माहिती

जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर

शास्त्रज्ञांना ब्लॅकबेरी आणि ब्ल्यूबेरीप्रमाणे अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असलेल्या टोमॅटोची जात विकसित करायची होती. यासाठी लाल टोमॅटोमध्ये जनुकीय बदल करण्यात आले. यासाठी स्नॅपड्रॅगन फ्लॉवर च्या दोन जनुकांचा उपयोग केला गेला. अँथोसायनिन या घटकांचे प्रमाण वाढवल्यामुळे या टोमॅटोला जांभळा रंग आला.

दिवसातून अर्धा कप जांभळ टोमॅटो खाल्ल्यास त्यात असलेलं अँथोसायनिन ब्लूबेरीइतकंच उपयुक्त ठरतं. शास्त्रज्ञांच्या मते हे जांभळे टोमॅटो औषध नाही, परंतु त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स अनेक प्रकारे उपयुक्त ठरतात. २०२३ पर्यंत जांभळे चेरी टोमॅटो बाजारात उपलब्ध होतील. तसंच या टोमॅटोची लागवड करता यावी यासाठी त्याचं बियाणंदेखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल.

बाजारात प्रचंड मागणी असणारा हा शेतीव्यवसाय करा, लखपती व्हा

जांभळ्या टोमॅटोची वैशिष्ट्ये



जांभळ्या टोमॅटोचा वास आणि चव लाल टोमॅटोसारखीच आहे.

अँथोसायनिन या घटकांचे प्रमाण वाढवल्यामुळे हे टोमॅटो जांभळ्या रंगाची आहेत.

जांभळे टोमॅटो लाल टोमॅटोपेक्षा जास्त आरोग्यदायी आहेत.

टिकवणक्षमता लाल टोमॅटोपेक्षा दुप्पट आहे.

हे पण वाचा:
pink potato : सामान्य बटाट्याऐवजी गुलाबी बटाट्याची लागवड करा – मिळतील लाखो रुपये..