गहू पिकासाठी पहिली फवारणी : नमस्कार मित्रांनो सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे.
तर आपण गहू पिकाची पहिली फवारणी कोणती करावी, हे जाणून घेणार आहोत.
Table of Contents
पहिली फवारणी का महत्त्वाची आहे ?
कारण पहिली फवारणी जर आपण घेतली, तर आपल्या गहू पिकाचे जास्तीत जास्त फुटवे निघणार आहेत.
जास्त जर फुटवे असेल तर, जास्त वमब्या असणार आहेत, आणि जास्त वमब्या असेल तर, जास्त उत्पन्न भेटणार आहे.
यामुळे पहिली फवारणी अतिशय महत्वाची आहे.
या फवारणी मध्ये आपण २ गोष्टी लक्षात ठेवल्या आहे.
- जास्तीत जास्त फुटवा कसा होईल ?
- काळा मावा कसा जाईल ?
गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी ?
१ . BIOVITA-X या टॉनिक 35ml + YARA Zinctrac 20ml + Karate 25ml.
२ . BIOVITA-X या टॉनिक 35ml + VARAD चॅलेंजर 7ml + Karate 25ml.
या दोहींपैकी कोणतेही एक कॉम्बिनेशन तुम्ही गहू पिकामध्ये पहिली फवारणी साठी घेऊ शकता.
फवारणी कधी करावी ?
आपला गहू जेव्हा साधारणपणे 30 दिवसांचा होईल, तेव्हा आपल्याला पहिली फवारणी करायची आहे.
पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी फवारणी करावी.
सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
असे केल्यास तुम्हाला खूप चांगले result पाहायला मिळतील.
धन्यवाद.