Crop Insurance : ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये अग्रिम पिकविमा वितरित होणार – धनंजय मुंडेंची माहिती

Maharashtra schemes,pikvima, पीकविमा, महाराष्ट्र पीकविमा,maharashtra pikvima,

Crop Insurance : राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.

याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे.

तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?

जिल्हालाभार्थीरक्कम
नाशिक३ लाख ५० हजार१५५.७४ कोटी
जळगाव१६,९२१४ कोटी ८८ लाख
अहमदनगर२,३१,८३११६० कोटी २८ लाख
सोलापूर१,८२,५३४१११ कोटी ४१ लाख
सातारा४०,४०६६ कोटी ७४ लाख
सांगली९८,३७२२२ कोटी ४ लाख
बीड७,७०,५७४२४१ कोटी २१ लाख
बुलडाणा३६,३५८१८ कोटी ३९ लाख
धाराशिव४,९८,७२०२१८ कोटी ८५ लाख
अकोला१,७७,२५३९७ कोटी २९ लाख
कोल्हापूर२२८१३ लाख
जालना३,७०,६२५१६० कोटी ४८ लाख
परभणी४,४१,९७०२०६ कोटी ११ लाख
नागपूर६३,४२२५२ कोटी २१ लाख
लातूर २,१९,५३५२४४ कोटी ८७ लाख
अमरावती१०,२६५८ लाख
एकूण३५,८,३०३१७०० कोटी ७३ लाख

Yojana : महाराष्ट्रातील योजनांची माहिती – येथे पहा