गायीच्या दूध आणि शेणाच्या पैशातुन बांधला तब्बल एक कोटींचा बंगला


चार एकर शेतीत दोन एकरमध्ये मुक्त गोठा तयार केला आहे. तसेच दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी हिरवी वैरण लावलेली आहे. त्यांनी 1998 साली एका गाईवर या व्यवसायाला सुरुवात केला होता. या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास 150 गायी वाढवल्या आहेत.
त्यांनी कधीच गाई विकली नाही. यामुळे त्यांच्याकडे 150 गाई आहेत. त्यांच्या मुक्त गोठ्यात नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते.


सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे हे अल्पभूधारक शेतकरी. मात्र तरी देखील ते यशस्वी झाले आहेत. प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत.


नेमाडेंनी उभारलेला हा व्यवसाय पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक इथे येऊन भेट देतात. त्यांना प्रकाशबापू सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करत असतात. बापूंची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबत असतात. बापूंची सून एकटी 55 गायींच्या धारा काढते.

हे पण वाचा:
Ratan tata biography in marathi : रतन टाटा माहिती मराठी

आता गोठ्यात चार मजूर कामाला असले तरी बापूंचे कुटुंब देखील या गोठ्यात राबत असते. शेणातूनही दरवर्षी 12 लाख रुपये मिळतात. आता बापूंनी गायी वाढवण्यापेक्षा कमी गायींपासून जास्त दुधासाठीचे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. या गायी 40 लिटरपर्यंत दूध देत आहेत.


Most Expensive Vegetable : जगातील सर्वात महाग भाजी माहितेय का ? किंमत ऐकून थक्क व्हाल !

हे पण वाचा:
Jambul sell on Amazon : शेतकरी amazon वर जांभूळ ची विक्री करत आहे | मिळत आहे एवढा भाव ?