weather today : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि, राज्यामध्ये १ डिसेंबर २ ० २ ४ ला ढगाळ वातावरण येणार आहे.
३ ते ४ दिवस जोरात वारे वाहू लागले तर, आपण समजायचे ४ ते ५ दिवसात आभाळ निघणार आहे, हा अंदाज निसर्ग देत असतो.
२ डिसेंबर नंतर कर्नाटक,तामिळनाडू,आंध्रप्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे.
२ ८ ,२ ९ ,३ ० नोव्हेंबर २ ० २ ४ दरम्यान तिरुपती बालाजी कडे मुसळधार पाऊस पडणार आहे.
हे लक्षात ठेवा
आपल्या राज्यात २ ते ८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस येणार.
२ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान राज्यात दरवर्षी अवकाळी पाऊस येतो हे कायम लक्षात ठेवा.
या भागात पाऊस : weather today
राज्यात ३ डिसेंबरला तो पाऊस नांदेड जिल्हा,अहमदपूर,उदगीर,अंबेजोगाई,परळी,लातूर जिल्हा,केज,धाराशिव,पंढरपूर या भागामध्ये २ ,३ ,४ डिसेंबर दरम्यान थोडाफार पाऊस पडणार.
४ ते ७ डिसेंबर दरम्यान सांगली,सावंतवाडी,राधानगरी,दौंड,सातारा,जत,पंढरपूर,लातूर,बीड जिल्याचा कडा आष्टी,संगमनेर,कोंकण,जळगाव,संभाजीनगर,वैजापूर,गंगापूर,शिर्डी,सिन्नर,श्रीरामपूर,कोल्हापूर,धाराशिव ,नांदेड या ठिकाणी पाऊस पडू शकतो.
राज्यात सर्वोदर पाऊस नाही, फक्त वरील भागात पाऊस.
विदर्भ हवामान अंदाज
विदर्भात तुरळक ठिकाणी थेंब येणार, म्ह्णून हा अंदाज लक्षात घ्यावा.
अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.