काय आहेत अटी अन् कोणाला मिळेल लाभ?
खरं तर, दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेमुळे या मजुरांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. तसेच राहणीमान देखील सुधारेल. त्याचबरोबर मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होईल.
विधवा व परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे. त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल.
यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन तसेच 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तसेच लाभार्थ्यांचे 18 ते 60 वयाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- भूमिहीन शेतमजूर असल्याचे तल्याठ्याकडील प्रमाणपत्र
- दारिद्र्य रेषेचे कार्ड
- विधवा / परित्यक्ता / घटस्फोटीता असल्याचा दाखला पुरावा पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञालेख
- रहिवासी दाखला ( किती वर्षाचा रहिवासी आहे याचा उल्लेख असलेले ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र
- रेशन कार्डाची सत्यप्रत
- इतर जमीन नसल्याबाबत प्रतिज्ञालेख