Animal Disease in Summer : उन्हाळ्यात जनावरांना होतात हे आजार / हे उपाय करा


अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या नाकातून सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्त्राव होतो.

हा रक्तस्त्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यावर उपाय म्हणून जनावराच्या डोक्यावर थंड पाणी ओतावं.

जनावरांना भरपूर थंड पाणी आणि हिरवा चारा द्यावा.

कडबा कुट्टी मशीन १००% अनुदान : येथे पहा

जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यामध्ये सावलीत राहतील याची काळजी घ्यावी.

रक्तस्त्राव थांबत नसेल तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क आहारातून किंवा औषधातून द्यावं.


कडव्या आजार

जास्त उन्हामुळे जनावरांच्या कातडीला कडव्या आजार होतो.

ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.

कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो.

नकली युरिया / डीएपी ओळखा २ मिनिटात : येथे पहा

चाऱ्याच्या कमतरतेमुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खातात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता जनावरांना कडव्या हा आजार होतो.

गाजर गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो. यावर उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावीत.

जनावरे गाजर गवत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याना भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावं. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा