उत्तराखंड राज्यातील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन येथील मौजे बासोट येथील गिरीशचंद्र बुथानी यांनी पाळलेल्या कोंबडीने एका दिवसात 31 अंडी दिले.
या कोंबडीने एका दिवसात 31 अंडी देऊन अनोखा विक्रम केला आहे.
ही बातमी ऐकून सर्वजण ही कोंबडी पाहण्यासाठी गिरीश चंद्र यांच्याकडे पोहोचत आहेत.
लोक या कोंबडीच्या जातीची माहिती देखील गोळा करत आहेत.
कोंबडीच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे, ही कोंबडी शेंगदाणे आणि लसूण अधिक प्रमाणात खाते.
एका दिवसात जवळपास 200 ग्राम शेंगदाणे या कोंबडीला लागतात.
याशिवाय ती लसूण देखील मोठ्या प्रमाणात खाते.
इतर अन्न मात्र ती फारशी खात नाही.
निश्चितच ही एक अनैसर्गिक अशी गोष्ट असून दिवसाला 31 अंडी देणारी ही कोंबडी सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.